कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात जुगार,मटका,बेकायदा दारू विक्री इत्यादी अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून या अवैध धंद्यांना त्वरित आवर घालावा अ...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरात जुगार,मटका,बेकायदा दारू विक्री इत्यादी अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून या अवैध धंद्यांना त्वरित आवर घालावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कोपरगाव शहरात मागील महिन्यापूर्वी नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले असून कोपरगाव शहरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे शहरात राजरोस पणे जुगार मटका व देशी विदेशी दारू बेकायदेशीर रित्या विक्री होत आहे बेकायदा दारू विक्री करणारावर राज्य उत्पादन शुल्क पथकांनी छापे टाकल्यावर या घटना उघड होत आहेत तसेच दरोड्याचा गुन्हा नुकतेच नगर येथे बदलून गेलेले अनिल कटके साहेब यांच्या नेतृत्वाखालील LCB पथकाने उघड केला तसेच सोन साखळी चोर व शहराच्या विविध भागात घरफोड्या चे प्रमाण वाढलेले दिसत असून रोज या बाबत घटना घडताना दिसत आहे.
यावरून मागील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात या धंद्यांना अभय तरी मिळत असले पाहिजे किंवा नवीन पोलीस अधिकारी यांची जरब तयार व्हावी म्हणून तरी हे गुन्हे उघड होत असले पाहिजे असे असले तरी कोपरगाव शहरात अवैध धंदे करणारानी आपले डोके वर काढले असून या धंद्या कडे पोलीस विभागाने त्वरित लक्ष घालणे आवश्यक आहे कारण या बेकायदा धंद्यातून मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी विशेष गस्ती पथके नेमल्यास व गस्ती पॉईंट नेमल्यास सोन साखळी चोर व घरफोड्या यांना आवर घालता येऊ शकतो आगामी नाताळ च्या सुट्ट्या व त्यामुळे अनेक नोकरदार आपल्या गावाकडे जातात मात्र त्यामुळे घरफोडयांचे प्रमाण वाढू शकते तसेच नूतन वर्ष साजरे होताना बेकायदा दारू शहरात दाखल होऊ शकते या साऱ्यांचा विचार करून याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या पत्रकात केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत