चिंचविहिरे येथे विवाहित तरुणीची आत्महत्या? नातेवाईकांकडून घातपाताचा संशय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथे विवाहित तरुणीची आत्महत्या? नातेवाईकांकडून घातपाताचा संशय

  देवळाली प्रवरा(वेबटीम)           सात महिण्यापुर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय अश्विनी गौतम नरोडे  या  नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून श...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

          सात महिण्यापुर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय अश्विनी गौतम नरोडे  या  नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून शेत तळ्यात उडी घेवून आत्महत्या केली असल्याची घटना चिंचविहीरे ता.राहुरी येथे घडली आहे.अश्विनीचे वडील व चुलते यांनी पती, सासरा, दोन सासा यांनी अश्विनी हिस बुधवारी पहाटे घरात मारुन शेत तळ्यात टाकून देवून तिने शेत तळ्यात आत्महत्या केली असल्याचा बनावा केला आहे. आत्महत्या केल्याची पोलिसांना खबर व पंचनामा न करता परस्पर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यावरुन अश्विनीने आत्महत्या केली नसुन तीची हत्या केली असल्याचा आरोप तिचे वडील अरुण मिजगुले यांनी केला आहे.

              चिंचविहिरे ता.राहुरी येथील अश्विनी गौतम नरोडे (वय-२०) या विवाहित तरुणीने उबुधवारी सकाळी ७ वाजण्या पुर्वी आत्महत्या केली असल्या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अश्विनीचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले यांनी सांगितले की, १८ एप्रिल २०२० रोजी कोल्हार ता.राहता येथे मानपानासह विवाह करण्यात आला होता. सुरवातीचे दोन महिने चांगले नांदवले गेले. त्यानंतर माझ्या मुलीस ञास देण्यास सुरवात झाली. मुलीने वेळोवेळी आम्हाला सांगितले आम्ही सर्वांनी समजावून सांगितले पण त्याचा उपयोग झाला नाही.अश्विनीने बुधवारी पहाटे ४.३० वाजता भ्रमणभाषवर संदेश पाठवला मला हे सर्वजण मारहाण करीत आहे. मला मारुण टाकतील. हा संदेश वाचण्यापुर्वीच अश्विनीचे सासरे विजय शंकर नरोडे यांनी अश्विनीने आत्महत्या केली असे फोनवरुन सांगीतले. 

               अश्विनीचे चुलते माधव दादासाहेब  मिजगुले यांनी सांगितले की, मगंळवारी राञी ११ वा. अश्विनीने मला फोन करुन सांगितले होते की मला शारीरीक व मानसिक ञास दिला जात आहे. त्यावर तीची समजुत काढुण मी सकाळी येतो असे सांगितले पण त्यापुर्वीच आश्विनीच्या आत्महत्येची बातमी कळाली होती. अश्विनीने आत्महत्या केली होती तर तिच्या घरच्यांनी पोलिसांना खबर का दिली नाही. पंचनामा केला नाही.परस्पर मृतदेह शवविच्छेदनासाठी का नेला. याबाबत आम्हाला शंका आहे. अश्विनीहिस पहाटच्या सुमारास मारुन शेत तळ्यात टाकले आहे.  आश्विनीचा पती गौतम विजय नरोडे, सासरा विजय शंकर नरोडे, सासु सोनाली विजय नरोडे, सावञ सासु प्रतिभा विजय नरोडे आदी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी माधव मिजगुले यांनी केली आहे. 

        राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यूची नोंद करुन वैद्यकीय अहवाला नुसार पुढील गुन्हा दाखल करण्यात येईल.पुढील तपास  पो.हे.काँ. डि.के. आव्हाड हे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत