उंबरे ः वेबटीम उंबरेत आजपासून अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्येही इच्छुकांची संख्या वाढती असू...
उंबरे ः वेबटीम
उंबरेत आजपासून अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्येही इच्छुकांची संख्या वाढती असून येथे मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असल्याने मोठी रंगत वाढली आहे. यंदा येथे धक्कादायक निकाल लागू शकतो
प्रभाग क्रमांक पाच हा सत्ताधारी गटाचे नेते तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांचा बालेकिल्ला समजला जातो. अनेक वर्षापासून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात विरोधकांना यश आलेले नाही. त्यातच या निवडणुकीत सत्ताधारी गटात कारखान्याचे माजी संचालक सुनिल आडसुरे यांची ताकद एकत्र झाली आहे. तसेच मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष राजेद्र ढोकणेही त्यांच्यासमवेत असल्याने प्रभाग क्रमांक पाचमध्ये विरोधकांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
सत्ताधारी आदिनाथ सेवा मंडळाकडून येथे जनरल उमेदवार म्हणून संजय आडसुरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याखालोखाल येथे दिलीपराव ढोकणे, गंगाधर आडसुरे, संतोष ढोकणे यांच्या नावाचीही जोरात चर्चा आहे. तर, कदाचित, पुन्हा एकदा दत्तात्रय तरवडे यांनाच रिंगणात उतरवले जाऊ शकते. याशिवाय सचिन नामदेवराव ढोकणे यांनाही अनपेक्षित रिंगणात उतवरले जाऊ शकते. तसेच ओबीसी महिला प्रवर्गातून माजी सरपंच विठ्ठल गोरे यांची स्नुषा व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गोरे यांची पत्नी सौ पूनम गोरे यांची उमेदवारी अंतिम आहे. जनरल महिला प्रवर्गातून कांचन संतोष ढोकणे, सौ. कविता ज्ञानदेव तरवडे यांच्यापैकी एक उमेदवार फायनल होण्याची आजतरी शक्यता आहे. शिवसेना नेते कैलास अडसुरे हे देखील येथे प्रबळ दावेदार आहेत,
दरम्यान, विरोधी गटाचे नेतृत्व तरूणवर्ग करत आहे. त्यासाठी साहेबराव दुशिंग, गोरक्षनाथ दुशिंग, कारभारी ढोकणे व नव्याने युवानेते संतोष ढोकणे मार्गदर्शन करत आहे. येथे जनरल उमेदवार म्हणून बाबासाहेब ढोकणे हे पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून त्यांनी दंड थोपटले आहेत. त्यांच्याबरोबर येथे बापुसाहेब दुशिंग, जालिंदर भिमराज ढोकणे, गणेश ढोकणे, दीपक ढोकणे, संदीप दुशिंग आदींच्या नावाचीही चर्चा आहे. तर ओबीसी प्रवर्गातून येथे बारवेकर, उंडे, शेजूळ यांच्या नावाची चर्चा असली तरी येथे प्रा. सारीका रामकृष्ण ढोकणे यांचे नावही आघाडीवर आहे. जनरल महिलावर्गात साखरबाई गोरक्षनाथ ढोकणे, सौ ज्योती गोरक्षनाथ ढोकणे, सौ मिराबाई जालिंदर ढोकणे, सौ मिरा गणेश दुशिंग, ज्योती दीपक ढोकणे, श्री शिवाजी ढोकणे यांच्या सौभाग्यवती यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक पाच हा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे दररोज इच्छुकांची संख्या वाढत असली तरी या प्रभागात मोठा घोडेबाजार होत असल्याने ‘अंगात दम आणि खिशात दाम‘ असलेलाच उमेदवार येथे लढण्यासाठी सक्षम असतो, असेच चित्र आहे. येथे छत्रपती प्रतिष्ठान, शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक पाच हा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे दररोज इच्छुकांची संख्या वाढत असली तरी या प्रभागात मोठा घोडेबाजार होत असल्याने ‘अंगात दम आणि खिशात दाम‘ असलेलाच उमेदवार येथे लढण्यासाठी सक्षम असतो, असेच चित्र आहे. येथे छत्रपती प्रतिष्ठान, शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत