कोपरगाव(वेबटीम) मागासवर्गीय समाजाची महिला ही जातीयतेची व अन्याय अत्याचाराची अशी दुहेरी संकटाची बळी ठरत असून महिलाना संकटात बळ मिळावे म्हणू...
कोपरगाव(वेबटीम)
मागासवर्गीय समाजाची महिला ही जातीयतेची व अन्याय अत्याचाराची अशी दुहेरी संकटाची बळी ठरत असून महिलाना संकटात बळ मिळावे म्हणूनच महिला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती, लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, दिल्लीत कथित बलात्काराची घटना घडल्यावर देशभर मशाल मोर्चे निघाले, कोपार्डी येथे एका सुवर्ण महिला भगिनीवर अत्याचार करून खून झाला तर संपूर्ण राज्यात मोर्चे निघाले. तसेच ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात त्या नंतर मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असते. मात्र मागास वर्गीय महिलेवर अत्याचाराच्या घटना घडतात तेंव्हा दुर्दैवाने मागास वर्गीय सोडून इतरांच्या मेणबत्या पेटत नाही मागास महिला जातीयते बरोबरच अन्याय अत्याचाराच्या अशा दुहेरी संकटाची बळी ठरत आहे .मात्र आता या महिलांना अन्याय अत्याचाराच्या विरोधात बळ देण्यासाठी मेणबत्या नाही तर मशाली पेटल्या पाहिजे आणि या पेटलेल्या मशालीने अन्याय अत्याचार झाल्या नंतर न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे वाट पहात राहण्यापेक्षा या मशालीत अन्याय करणारा भस्मसात झाला पाहिजे या करिता लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने दि २८ डिसेंबर २०२० रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बिलोली येथे दिव्यांग महिलेवर अत्याचार करून खून केल्याचा निषेधार्थ महिला मशाल मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चास लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे, प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ, व्ही.जी डोईवाड, रावसाहेब पवार, नामदेव गायकवाड हे मार्गदर्शन करणार असून लोक स्वराज्य आंदोलनाच्या महिला आघाडीच्या द्रोपदाताई कांबळे, अनिता तेलंग, मनीषा किंजवडे, तुळसाताई गणोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करणार आहे.तर मशाल मोर्चा यशस्वीते साठी महिला आघाडी परिश्रम घेत आहेत या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत