कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर व तालुक्यातील जुगार,मटका व बेकायदेशीर दारू विक्री अशा अवैध व्यावसायत अनेक बडे धेंड असून कोपरगाव पोलीस स्टेशन य...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहर व तालुक्यातील जुगार,मटका व बेकायदेशीर दारू विक्री अशा अवैध व्यावसायत अनेक बडे धेंड असून कोपरगाव पोलीस स्टेशन या बड्या धेंडा वर कारवाई करणार का ? असा खुला सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, पोलीस स्टेशनला कोणताही अधिकारी आला तरी नियम पाळणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना त्याचे काही वाटत नाही. मात्र मागील महिन्यात कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन मध्ये नवीन अधिकारी नव्याने रुजू झाले मात्र त्यानंतर नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यां च्या सत्कार करण्यात अनेक राजकीय पक्ष व कार्यकर्ते यांची चढाओढ दिसून येत होती .मात्र या कोणत्याच नागरिकांनी शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा दारू,जुगार, मटका व्यवसायाकडे पोलीस अधिकारी यांचे लक्ष वेधून घेतले नाही. तसेच सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्टेशन मध्ये सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी केल्याचे दिसून येत नाही यातील सर्व बेकायदा व्यवसायात नसले तरी अनेकानी आपली बेकायदा व्यवसायाची गाडी नियमित करून घेतली असे दिसते.
मागील आठवड्यात कोपरगाव शहर व ग्रामीण भागात या व्यवसायावर पोलिसांनी लुटुपटू च्या कारवाई देखील केली मात्र पोलीस देखील या व्यवसायाच्या मुळाशी जाऊन चौकशी करताना दिसत नाही दारू जुगार व मटका व्यवसायात अनेक मोठ्या हस्ती सहभागी असून एखाद्या पंटर ला हाताशी धरून राजरोस पणे कोपरगाव शहर व तालुक्यात हे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून पोलिसांनी लुटुपटू च्या कारवाया करण्यापेक्षा या व्यवसायातील बड्या धेंडावर कारवाई करावी अन्यथा हे व्यवसाय बंद करावे म्हणून वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल असेही या पत्रकात म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत