वळण(गोविंद फुणगे) राहुरी तालुक्यातील वळण येथे आज जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांच्...
वळण(गोविंद फुणगे)
राहुरी तालुक्यातील वळण येथे आज जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक भीमराज गडधे,मंगेश बनकर यांनी जमिनीचे आरोग्य कसे सुरक्षित ठेवावे, सेंदिय खताचे महत्व, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना,माती परीक्षण कसेे करावे ,जमीनाचा पोत कसा सुधारावे याबाबत शेतक-यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसून येणारी लक्षणे आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती शेतक-यांना देण्यात आली.
याप्रसंगी सोसायटीचे मा.चेअरमन मुकुंदा काळे,तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ खुळे,बाबासाहेब आढाव,बाबासाहेब कार्ले,उमेश खिलारी,भानाभाऊ खुळे,बाळासाहेब तोगे,किरण पवार,आप्पासाहेब आढाव,रमेश खुळे, सुभाष बनकर, आदिंसह शेतकरी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत