कोपरगाव(वेबटीम) करोना साथीच्या आजारामुळे सर्वच पर्यटन स्थळे बंद आहेत. मात्र कोपरगाव शहरातील जनतेला हिल स्टेशनवरील पर्यटनाचा अनुभव घ्यायचा...
कोपरगाव(वेबटीम)
करोना साथीच्या आजारामुळे सर्वच पर्यटन स्थळे बंद आहेत. मात्र कोपरगाव शहरातील जनतेला हिल स्टेशनवरील पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोपरगाव नगरपालिका हद्दीतील धारणगाव रोडला यावे ,असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,गेल्या काही महिन्या पासून देशभर करोना साथीच्या आजाराने थैमान घातले असून देशातील सर्वच पर्यटन स्थळे व हिल स्टेशन बंद आहेत. मात्र कोपरगाव नगरपालिकेच्या सौजन्याने कोपरगाव शहरातील नागरिकांची काळजी घेण्यात आली असून कोपरगाव शहरात नागरिकांना हिल स्टेशन व पर्यटनाचा आनंद घेता येतो.
त्यामुळे जनतेने कोपरगाव तालुक्यातील आजी माजी नेत्यांनी दिलेले नेतृत्व नाकारून लोकप्रिय नगराध्यक्ष यांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्यावेळी राज्यात व केंद्रात भाजप चे सरकार होते व लोक प्रिय नगराध्यक्ष यांची राजकीय पार्श्वभूमी व वजन पहाता कोपरगावच्या नागरिकांच्या शहर विकासाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या .मात्र त्या वेळी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार व लोक प्रिय नगराध्यक्ष यांचे दरम्यान वाकयुद्ध रंगात आले आणि कोपरगाव शहराच्या नागरिकांचे स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न भंग पावले छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हा मुख्य रहदारीचा रस्ता असून या रस्त्या वरून मोठी वाहतूक आहे मात्र या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना ये जा करणे जिकिरीचे झाले होते मात्र काही दिवसांपूर्वी या मुख्य रस्त्यावरील खड्डे नगर पालिकेने मुरूम टाकून बुजविण्याचा राज्याला आदर्श ठरावे असे दिशादर्शक काम केले मात्र आता या रस्त्यावरील मुरूमाची माती झाली असून प्रचंड धूळ होत आहे त्यामुळे नागरिकांनी पुन्हा ओरड केल्यामुळे काही दिवसा पासून या रस्त्यावर ट्रॅकर द्वारे पाणी मारले जात आहे.
या रस्त्यावरून आजी माजी आमदार यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याची बैलगाडी द्वारे ऊस वाहतूक होत असे त्यामुळे या रस्त्यावरील मुरूमाची माती झाली आहे मात्र या वर्षी आजून तरी महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने वाळू वाहतूक सुरू नाही.
मात्र या रस्त्यावर खड्डे सकाळी धूळ,संध्याकाळी नगरपालिकेच्या सौजन्याने पाणी मारले जाते त्यामुळे पर्यटन स्थळी खाच खळग्या तील रस्ते,धुके व रिमझिम पाऊस याच प्रमाणे धारणगाव रोडवर नगर पालिकेच्या सौजन्याने खड्डे, पाणी व धूळ अनुभवास येत असून या रस्त्याच्या कडेला चिकन टिक्का व देशी विदेशी मद्य विक्रीचे दुकान तसेच विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी नगर पालिका वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून विविध दुकाने थाटली आहेत त्यामुळे पर्यटन स्थळासारखी गर्दी दिसून येते अशा प्रकारे या रस्त्यावर नागरिकांना पर्यटन स्थळाचा अनुभव येत आहे त्या मुळे नागरिकांना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच नगरपालिका निवडणुकीपूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरण व उदघाटनाचा घाट घातला जाईल.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत