देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदाची दिपावली पाडवा या मुहुर्तावर माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी निवड केली. शुभ दिव...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा सोसायटीची सत्ता माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. संस्थेच्या निवडणूकीत सभासदांनी एकहाती सत्ता माजी.आ. कदम यांच्या ताब्यात दिली संचालक मंडळातून प्रत्येक वर्षी एका संचालकास चेअरमन होण्याची संधी देण्याचे ठरले होते. पहिल्यावर्षी सोपानराव शेटे यांना चेअरमनपदाची संधी देण्यात आली होती. दुसऱ्यावर्षी शहाजी कदम तर तिसऱ्यावर्षी सोपानराव भांड चौथ्यावर्षी दिलीपराव मुसमाडे पाचव्यावर्षी पुन्हा सोपानराव शेटे यांना संधी देण्यात आल्याने काही संचालकांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या जवळ नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष कदम यांच्या गटातील संचालकांना राजेंद्र ढुस यांना चेअरमनपदाची संधी मिळावी अशी अशा होती. परंतू माजी आ.कदम यांनी राजेंद्र ढुस यांना डावलून सोपानराव शेटे यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली.त्यामुळे नगराध्यक्ष कदम यांच्यासह पाच संचालकांनी परखड नाराजी व्यक्त करीत विरोध केला. पाच हि संचालक यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.
सोपानराव शेटे यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या राजकारणात गरमागरम वातावरण आहे. चेअरमन निवडीनंतर नगराध्यक्ष कदम यांच्यासह पाच संचालकांनी आक्रमक पविञा घेतला.सोपानराव शेटे यांची निवड रद्द करा किंवा शेटे यांनी स्वतःहुन राजीनामा द्यावा असेहि नगराध्यक्ष कदम सह पाच संचालकांनी मागणी केली होती. परंतू त्यास प्रतिसाद मिळाला नसून नगराध्यक्ष कदम आक्रमक पविञ्यात असतानाच ते अचानक आजारी पडल्याने सोसायटी राजकारणावर पडदा पडला आहे. परंतू ते व्यवस्थित झाल्यावर पुन्हा सोसायटीचे राजकारण तापणार असल्याची कुजबुज संचालक मंडाळात सुरु आहे.
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उर्मिला शेटे यांना संधी मिळणार ?
सोसायटीच्या राजकारणामागे नगर पालिकेचे राजकारण छुपले असल्याची चर्चा सुरु असताना नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उर्मिला शेटे यांना संधी देण्यासाठी देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमनपद शेटे यांच्याकडे नको आहे अशी चर्चा समोर आली आहे.सोसायटी चेअरमन सोपानराव शेटे यांचे पद काढून घेवून त्याजागी राजेंद्र ढुस यांना संधी मिळावी यासाठी नगरपालिकेतील काही नगरसेवक पुढाकार घेत आहे. ढुस चेअरमन झाल्यास नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद उर्मिला शेटे यांना देण्यात येईल अशी हि चर्चा नगरसेवक व संचालक मंडळात चालू आहे. परंतू शुक्रवार दि.४ रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम याच्या वाढदिवसा निमित्त शहरात फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले. त्यामध्ये १० ते १५ फ्लेक्स बोर्ड एकट्या उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी लावले होते.उपनगराध्यक्षपदाला धोका पोहचवू नाही म्हणून तर सर्वाधिक फ्लेक्स बोर्ड लावले नसतील ना? असा प्रश्न अनेकांनी केला आहे.तर भारत शेटे यांनी आपल्या पत्नीला उपनगराध्यक्षपद मिळावे म्हणून राहुरी कारखाना परीसरात पाच ते सात ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावले 'हम भी कुछ कम नही' हेच दाखवून देण्यात आले.शेवटच्या टप्प्यातही उर्मिला शेटे यांना उपनगराध्यक्षपद देण्यासाठी नगराध्यक्ष कदम आग्रही असल्याचे नगरसेवक व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेतून समजते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत