बाभळेश्वर(वेबटीम) माती इतके श्रेष्ठ दुसरे काहीच नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीचे महत्त्व संतांनी अनेक दाखले देऊन सांगितले आहे. ...
बाभळेश्वर(वेबटीम)
माती इतके श्रेष्ठ दुसरे काहीच नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीचे महत्त्व संतांनी अनेक दाखले देऊन सांगितले आहे. आपण सणसूद साजरे करतो. यात देखील प्राणी, पिके आणि मृदा यांचेच पूजन केले जाते म्हणून जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या असे आवाहान अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
त्या कृषि विज्ञान केंद्र,बाभळेश्वर अाणि कृषि विभाग राहाता यांचे संयुक्त विद्यमाने मौजे चंद्रापूर (ता.राहाता) येथील कृषिभूषण बन्सी बाळू तांबे यांच्या वस्तीवर जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित शेतकरी चर्चासत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, हसनापूरच्या प्रगतशील शेतकरी अब्बास पटेल,रामभाऊ कोठुळे, उज्ज्वला तांबे, कृषी अधिकारी सर्वश्री नारायण लोळगे, सागर क्षिरसागर, सचिन गायकवाड तसेच आत्माचे व्यवस्थापक सर्वश्री किशोर कडू, राजदत्त गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ विखे पाटील पुढे म्हणाल्या की,शेतकरी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयोग करतात. जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. आज काही ठिकाणी भाजीपाला फळांवर भरमसाठ विषारी औषधे वापरली जातात. याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे असे सौ विखे पाटील म्हणाल्या. जनसेवा फाऊंडेशन मार्फत अनेक उपक्रम महिलांसाठी राबवले जात आहेत. यातून महिलांना रोजगार निर्माण होत आहे. संस्थेचे भविष्यातही अनेक योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्राचे मृदविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी मृदा दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी श्री सोनवणे यांनी जमिनीसाठी लागणारे जैविक घटक,अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पिक पध्दती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सी तांबे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या दोन पुरुष आणि एका महिला बचत गटाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते भू मातेचे पूजन आणि कृषिभूषण गोल्ड या गांडूळ खत प्रकल्पाचे उद्यघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार शास्त्रज्ञ सुनील बोरुडे यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत