अकोले नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोले नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार

  अकोले(वेबटीम) केंद्राने मंजूर केलेले तीनही कृषी विधेयके सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत असे सांगून मोफत गॅस, करोना च्या काळात केलेले मोफत धा...

 अकोले(वेबटीम)



केंद्राने मंजूर केलेले तीनही कृषी विधेयके सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत असे सांगून मोफत गॅस, करोना च्या काळात केलेले मोफत धान्य वाटप आणि अन्य विकासाची कामे ही केंद्राची मोठी उपलब्धी आहे. अशा  आशयाचे प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पत्रकार परिषदेत केले.
आगामी नगरपंचायत निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल असे सांगताना मित्रपक्षाने अजून पर्यंत विचारणा केलेली नाही. तशी वेळ आल्यास त्या वेळी निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

पिचड म्हणाले की, सध्या आमदार लोकहिताच्या गप्पा मारतात. परंतु लोकहिताची कामे करत नाहीत असा टोला लगावून गेल्या वर्षभराच्या संकल्पपूर्ती मध्ये निवडणुकीत यांनी किती आश्वासने दिलेली वास्तवात उतरली आहे याचा लेखाजोखा सर्वांच्या पुढे आणावा असे खुले आव्हान त्यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना दिले.

ते म्हणाले की आपल्या काळातील मंजूर कामांचे उद्घाटन विद्यमान आमदार घेत असून खरे म्हणजे त्यांनी मंजूर कामाची तारीख किंवा तसा फलक कामाच्या ठिकाणी उभा करण्याची नितांत गरज असल्याचा जोरकस टोला यांना त्यांनी लगावला.  पक्ष सोडून जाणारे यांची मनधरणी केली नाही का असे विचारले असता याबाबत पक्ष सोडून जाणाऱ्यांशी चर्चा करून मनधरणी केली मात्र त्यांचा भाजप सोडण्याचा निर्णय ठाम होता.निवडणुकीत माझा प्रचार केला, आणि मी जर आमदार झालो असतो तर हे पक्ष सोडून गेले असते का ?असा सवाल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी करीत शेवटी कोणाची  मनधरणी किती करायची यालाही मर्यादा आहेत.माझ्यावर विश्वास असलेले माझे सखे सोबती माझ्याबरोबर आहेत,निश्चितच या पुढे जोमाने सर्वजण काम करतील असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला.



पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे,पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे ,राहुल देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे,हितेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आ. वैभवराव पिचड म्हणाले की, भाजपची नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी ही सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवतील. करोना व इतर सर्व बाबींचा विचार करण्यास वेळ लागला म्हणून ही कार्यकारिणीची निवड करण्यास उशीर झाला आहे.जुन्या नव्यांचा ताळमेळ बसविताना व पद मर्यादा कमी असल्याने काही नाराज असतील परन्तु ते संयमी असल्याने  येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सर्व एकदिलाने काम करणार असून भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारची ही दुसरी टर्म असून त्यांनी शेतकर्‍यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. करोनाच्या काळात राज्य सरकारने तालुक्यासाठी  काहीही  मदत केली नाही. ग्रामपंचायतीचा विकास कामांचा निधी राज्य शासनाने परत घेतला. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यामध्ये राजकारण आणून खोडा घातला. अतिवृष्टीची निधी कमी आला याला.आमदार जबाबदार आहेत.अशी टीका त्यांनी केली.

नगरपंचायतने करोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले.तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याने कोविड सेंटर उभारून औषधेही उपलब्ध करून दिली. मात्र लोकप्रतिनिधी व शासन तालुक्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कमी पडले आहे. तालुक्यातील सर्व संस्था ह्या चांगले काम करीत असून या पुढेही अतिशय जोमाने काम चालू राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

  रविवार ( दि.६ )  पंडित दीनदयाळ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक जालिंदर वाकचौरे यांनी केले तर आभार गिरजाजी जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत