कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात चिंतेचे वातावरण आहे .जे नागरिक मास्कचा वाप...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात चिंतेचे वातावरण आहे .जे नागरिक मास्कचा वापर करणार नाही आशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करणार असा इशारा कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पीआय हर्षवर्धन गवळी यांनी दिला आहे.
कोपरगाव शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली होती .या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून शुक्रवारी शहरात १३१ नागरिकांवर कारवाई करून १५९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे पीआय हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले.त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येईल .
महिला मुली व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटेल असे कार्य करणार असल्याचे पीआय हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत