देवळाली प्रवरा (वेबटीम) देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची आज शनिवार दि. ५ डिसेंबर २०२० रोजी सायं ०५.०० वा. श्रीरामपूर ये...
देवळाली प्रवरा (वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची आज शनिवार दि. ५ डिसेंबर २०२० रोजी सायं ०५.०० वा. श्रीरामपूर येथील पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांनी पाहणी केली, या प्रसंगी राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस आदी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती साठी नगरपालिकेनेच खोडा घातला असल्याची बाब आप्पासाहेब ढुस यांना माहिती अधिकारात मिळविलेल्या माहिती मध्ये उघड झालेने आप्पासाहेब ढुस यांनी ही बाब अहमदनगर चे जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील साहेब यांची अहमदनगर येथे समक्ष भेट घेऊन निदर्शनास आणून दिली. म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक साहेबांच्या आदेशानुसार आज श्रीरामपुर चे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके साहेब यांनी देवळाली प्रवरा येथील नगर परिषद कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या महाराष्ट्र पोलीस खात्याच्या जागेवर येऊन आज कागदपत्रांसह समक्ष पाहणी केली.
या विषयीची पूर्वपीठिका अशी की, देवळाली प्रवरा येथील नगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या तसेच प्रवरा नदी च्या पट्ट्यातील ३२ गावातील वाढती गुन्हेगारी व त्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यावर वाढणारा ताण लक्ष्यात घेऊन देवळाली प्रवरा गावात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू केले आहे. सध्या देवळाली प्रवरा विविध कार्य सेवा सह सोसायटीच्या इमारती मध्ये भाडे तत्वावर हे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. म्हणून या पोलीस ठाण्याची स्वतःच्या जागेत स्वतंत्र इमारत असावी आणि येथे पोलिसांचे संख्याबळ वाढून या परिसरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सण १९७९ पासून येथील जनता तसेच विविध संघटना प्रयत्नशील होते व आजही आहेत.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यालया जवळ असलेली पोलीस ठाण्याच्या स्वमालकीच्या गट नंबर १६३२ मधील अर्धा एकर बिनशेती क्षेत्र महाराष्ट्र पोलीस खात्याच्या नावावर आहे. तथापी देवळाली प्रवरा नगरपालिकेने सन २०१३ च्या विकास आराखडा मध्ये या जागेवर शॉपिंग सेंटर व पार्किंग चे आरक्षण टाकले आहे.
देवळाली प्रवरा येथे जरी नूतन पोलीस ठाणे मंजूर झाले तरी या जागेवर नगरपरिषदेचे शॉपिंग सेंटर व पार्किंग चे आरक्षण असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या येथे नवीन पोलीस ठाणे इमारत बांधकाम करण्यास नगरपालिका बांधकाम परवानगी देऊ शकत नाही.
त्यामुळे देवळाली प्रवरा येथील नूतन पोलीस स्टेशनला नगरपालिकेने विकास आराखड्यात शॉपिंग सेंटर व पार्किंग चे आरक्षण टाकून एकप्रकारे खोडाच घातला असल्याची बाब आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक साहेबांच्या आदेशानुसार आज श्रीरामपूर चे उप अधिक्षक संदीप मिटके , राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे उपस्थितीत पाहणी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत