देवळाली पोलीस ठाणे आरक्षणचा चेंडू नगरपालिकेच्या कोर्टात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली पोलीस ठाणे आरक्षणचा चेंडू नगरपालिकेच्या कोर्टात

देवळाली प्रवरा (वेबटीम) येथील पोलीस खात्याच्या जागेवर नगरपरिषदेने टाकलेले आरक्षण हटविणेसाठी  जिल्हा पोलिस अधिक्षक  अहमदनगर यांची आप्पासाहेब ...

देवळाली प्रवरा (वेबटीम)

येथील पोलीस खात्याच्या जागेवर नगरपरिषदेने टाकलेले आरक्षण हटविणेसाठी  जिल्हा पोलिस अधिक्षक  अहमदनगर यांची आप्पासाहेब ढुस यांनी भेट देऊन आरक्षण हटविणेसाठी मागणी केली होती. 

 मागणी नुसार जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राहुरी यांनी  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील पोलीस खात्याच्या मालकी हक्क जमिनीवर नगरपालिकेने बेकायदेशीर टाकलेले आरक्षण तातडीने रद्द करण्याकरता  पत्रव्यवहार केला आहे. 

आरक्षण तात्काळ रद्द करण्याची पोलीस प्रशासनाची मागणी असून त्यामुळे देवळाली प्रवरा येथील पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलीस खात्याच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यवाहिकडे पोलीस प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत