कोपरगाव बांधकाम कामगार असोसिएशन स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव बांधकाम कामगार असोसिएशन स्थापना

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगावच्या इमारत बांधकाम क्षेत्रातील काही  कामगार युवकांनी मिळुन कामगारांच्या उत्कर्षासाठी कोपरगाव येथे कोपरगाव इमारत बां...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगावच्या इमारत बांधकाम क्षेत्रातील काही  कामगार युवकांनी मिळुन कामगारांच्या उत्कर्षासाठी कोपरगाव येथे कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

 हे असोसिएशन धर्मदाय आयुक्ताकडुंन नोंदणीकृत केले असुन  असोसिएशन फलक अनावरण सोमवार २२ डिसेंबर रोजी कोपरगावचे मध्यवर्ती ठिकाण गांधीनगर इनडोअर गेम हाॅल समोर फलक लावुन असोसिएशनचे उदघाटन नगर पालिकेचे लोकनियुक्त नगरध्यक्ष विजयराव वहाडणे  यांच्या हस्ते करण्यात आले.

 या वेळी कार्यक्रमाला को.न.पाचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमुदभाई सय्यद, माजी नगरध्यक्ष राजेंद्र सोनवणे ,मंगेशराव पाटील तसेच माजी शिक्षण सभापती विनोद राक्षे, इंजिनिअर भागवत सर , व्यापारी संघर्ष समितीचे अकबर भाई, निसार भाई, कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा चोरगे,उपाध्यक्ष कृष्णा आघाडे, सचिव महेश मवाळ ,सहसचिव संतोष लांडगे ,खजिनदार दिलीप घुमरे, प्रसिद्धप्रमुख विशाल अभंग ,कार्याध्यक्ष मधुकर खिल्लारी, सहकार्याध्यक्ष दाऊदभाई पठाण, किरण आघाडे, इस्माईल शेख, बाळासाहेब संवत्सकर साजिद शेख आदींसह इमारत बांधकाम कामगार बांधवांनी उपस्थित राहुन उत्स्फूर्तपणे असोसिएशन फलक अनावरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. फलक अनावरणा नंतर पेढ वाटुन कार्यक्रम आनंदाने संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत