कोपरगाव(वेबटीम) सर्व सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेऊन समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय देणारी जगातील सर्वोच्च राज्य घटना देशाला दे...
कोपरगाव(वेबटीम)
सर्व सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेऊन समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय देणारी जगातील सर्वोच्च राज्य घटना देशाला देणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न वंचित घटकाला न्याय मिळाल्या शिवाय पूर्ण होणार नाही ,असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलन व घटनाकार मैत्री संघ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्य घटना लिहिताना अनेक देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास केला. मात्र ही राज्यघटना लिहिताना या देशातील वंचित पीडित घटक डोळ्या समोर ठेऊन समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक व आर्थिक न्याय या मूलभूत हक्कातून वंचित घटकांना स्वाभिमानी व सक्षम बनवून देशाप्रती आदर निर्माण होईल असे महान कार्य केले मात्र स्वातंत्र्याच्या नंतर या तत्वांचा विसर पडल्याने आजही देशात विषमता दिसून येते एका बाजूला देश जागतिक महासत्तेच्या स्वप्ने पहात असताना देशातील अनेक समाज घटक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर वंचित घटकांना सामाजिक न्याय देणे अभिप्रेत आहे.
यावेळी घटनाकार मैत्री संघाचे संस्थापक नितीन बनसोडे बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर समाज उभा करण्यासाठी प्रत्येक घटकाने काम करणे आवश्यक आहे.
यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे सुजल चंदनशिव यांनी प्रास्ताविक केले. तर गौतम बनसोडे यांनी आभार मांडले.
कार्यक्रमास विशाल आव्हाड, ससाणे बाबा मयूर औताडे,अमर नेहे, रतन भारती, दत्तू घोडेराव,विजय पेटारे, अनिल आवारे,सोपान सावंत,रफिक तांबोळी, सागर वैरागळ,किशन भालेराव,कैलास कुऱ्हाडे, गोरख दुशिंग, सनी आवारे, उमेश पगारे, गिरीष शेवाळे लक्ष्मण त्रिभुवन गणेश विसपुते आदी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत