लोकप्रतिनिधींना किमान शैक्षणिक पात्रता ठरवावी- सुजल चंदनशिव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकप्रतिनिधींना किमान शैक्षणिक पात्रता ठरवावी- सुजल चंदनशिव

  कोपरगाव(वेबटीम)  भारतीय  राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्क दिले असून राज्य घटनेपुढे प्रत्येक नागरिक मग तो गरीब असो की श्रीमंत सम...

 कोपरगाव(वेबटीम)


 भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्क दिले असून राज्य घटनेपुढे प्रत्येक नागरिक मग तो गरीब असो की श्रीमंत समान आहे मात्र लोक सभेपासून ग्रामपंचायती पर्यंत लोक प्रतिनिधींची किमान शैक्षणिक पात्रता ठरवून द्यावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे कोपरगाव युवा शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत ते लोकसभेमध्ये कोणताही भारतीय नागरिक प्रतिनिधित्व करू शकतो. मात्र त्याला शिक्षणाचा गंध नसेल तर विकास निधी खर्च करताना प्रशासकीय अधिकारी यांचेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शासकीय निधीतुन झालेल्या विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असतो आणि असा प्रतिनिधी निवडून गेल्या नंतर त्याच्या कडून जनतेची  निराशा पदरी पडते.

 ग्रामपंचायत ,पंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्य व खासदार आमदार यांची उमेदवारी करताना शैक्षणिक अट घातल्यास विविध योजना प्रभावी पणे मांडता येतील.

तसेच या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या प्रतिनिधी कडून चौकस पणे विकासाची कामे होतील त्यामुळे विविध ग्रामपंचायती साठी किमान दहावी पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिकेसाठी बारावी व आमदार खासदार यांच्यासाठी पदवी अशी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित करावी असे या पत्रकात म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत