वळण( प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील वांजोळपोई येथे रासपच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त रासपाचे यु...
वळण( प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील वांजोळपोई येथे रासपच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त रासपाचे युवा जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शिलेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ,शिक्षण म्हणजे वाघिणी च दूध आहे अशी शिकवण देणारे महामानव डाॅ.आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी हा सुत्य उपक्रम राबविला असल्याचे जुंधारे यांनी सांगितले.
यावेळी विलास सैंदोरे ,सरपंच नामदेव पवार, ह. भ. प .माकोने महाराज ,ए.डी पवार, दौलतराव पवार, बाळासाहेब कोळपे,आप्पासो पवार, श्रीरंग पवार, ज्ञानेश्वर पवार एकनाथ पवार, योगेश पवार, सुधाकर पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत