उंबरे : वेबटीम। उंबरे गावात अजून अनेक विकास कामे करणे बाकी आहे, ही कामे करण्यासाठी निधीची गरज आहे, त्यासाठी गावाने बिनविरोध निवडणूक क...
उंबरे : वेबटीम।
उंबरे गावात अजून अनेक विकास कामे करणे बाकी आहे, ही कामे करण्यासाठी निधीची गरज आहे, त्यासाठी गावाने बिनविरोध निवडणूक करताना सरपंच पदासाठी 21 लाख, उपसरपंच पदासाठी 11 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 51 हजार रुपयांच्या पुढे जाहीर लिलाव करावेत, अशी संकल्पना गावचे युवानेते भाऊसाहेब काका ढोकणे यांनी मांडली आहे.
भाऊसाहेब काका म्हणाले, गावच्या विकासासाठी निधीची गरज आहे, मात्र कोरोना संकटामुळे शासनाचा निधी कमी प्रमाणात येत आहे, परिणामी, गावात विकासकामे करता येत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता तसेच निवडणूक घेतल्यास प्रचार फेऱ्या, सभा, मतदान यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे, याउलट गावाने या निवडी बिनविरोध करून गावासाठी निधी कसा जमा होईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी माझी कल्पना आहे. यासाठी मागासवर्गीय जागेवरील सदस्य असल्यास त्याने 51 हजाराच्या पुढे बोली लावावी, ओबीसी जागेसाठी 1 लाख 51 हजारांच्या पुढे बोली लावावी, जनरल जागेसाठी 2 लाख 51 हजारांच्या पुढे बोली लावावी, त्यानंतर सरपंच निवडीसाठी 21 लाखांच्या पुढे बोली लावून, ज्याच्यात हिंम्मत असेल तो बोली लावेल व त्यास गावचे सरपंच पद बहाल करावे आणि जो 11 लाखांच्या पुढे बोली लावेल, त्यास उपसरपंच पद बिनविरोध द्यावे, यातून गावाला मोठा निधी मिळेल, त्यात गावातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शाळा अशी अनेक कामे मार्गी लागतील, त्यामुळे शक्य झाल्यास याबाबत गावातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी व तरुणांनी विचार करावा, मी स्वतः सरपंच पदाच्या बोलीत सहभागी होऊन गावच्या विकासासाठी बोली लावण्यासाठी पुढे असेल, असेही ढोकणे यांनी सांगितले. दरम्यान, ढोकणे यांच्या या संकल्पनेतून गावाला मोठा फायदा होंणार असल्याने त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत