आरडगाव(राजेंद्र आढाव) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणार्या केंदळ खूर्द ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच...
आरडगाव(राजेंद्र आढाव)
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणार्या केंदळ खूर्द ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाच्या राजीनाम्यानंतर अखेर कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दि.७ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीची निवडणूकत जय भवानी मंडळाचे विखे,कर्डिले गटाचे सरपंच सौ.अनिता आढाव उपसरपंच बाळासाहेब आढाव मंदाकिनी आढाव वृषाली आढाव लताबाई मगर सतिश आढाव गोरक्षनाथ जाधव हे तर जनसेवा मंडळाचे तनपुरे गटाकडून राजेंद्र आढाव संगीता केदारी मनकर्णा सूर्यवंशी हे सरपंचसह 10 सदस्यां निवडून आले होते.
गुरुवार दि.19 नोव्हेंबर रोजी केंदळ खुर्द ग्रामपंचायतचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ अनिता अनिल आढाव यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा राहुरी पंचायत समितीच्या सभापती सौ.बेबीताई सोंडणर यांच्या कडे सादर केले. हा राजीनामा पडताळणीनंतर सरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेला असल्याने या पदाचे दावेदार सदस्यांमधून
वृषाली आढाव ,लताबाई मगर ,मंदाकिनी आढाव हे असल्याने नेमके सरपंचपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
दि .५ मार्च २०२० रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेल्या तसेच राजेंद्र ग.भागवत सचिव महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांनी प्राधिकृत प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार पुढील दोन वर्षत सर्व ग्रामपंचायत सदस्य व मंडळांना सर्व कार्यकर्तेना विश्वासात घेऊन गावाच्या सर्वांगिन विकासासाठी पुढील सरपंचाची निवड कोणतीही प्रबळ दावेदारी व रस्सीखेच न करता सरपंच निवड सदस्यांमधुन केली जाईल व सर्वांना गावच्या विकासासाठी संधी देण्यात येईल .
संदिप आढाव
माजी सरपंच ग्रामपंचायत केंदळ खूर्द


कोणत्याही टिप्पण्या नाहीत