राहूरी(वेबटीम) नैसर्गिक व केमिकलविरहित प्रॉडक्ट हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून गुळाची तीच गुणवत्ता वसुंधरा उद्योग समुहाने विकसित करून ...
राहूरी(वेबटीम)
नैसर्गिक व केमिकलविरहित प्रॉडक्ट हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून गुळाची तीच गुणवत्ता वसुंधरा उद्योग समुहाने विकसित करून सर्वांचा विश्वास संपादीत करावा असे प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांनी केले.
राहूरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील वसुंधरा ऍग्रो इंडस्ट्रीज(नैसर्गिक व केमिकल विरहित) गूळ उद्योग व वसुंधरा वे ब्रिजचे उदघाटन प्रसंगी महंत कैलासगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी गणेश दादा भांड बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे,नगरसेवक सचिन ढुस, वसुंधरा ग्रुपचे सर्वेसर्वा खंडेराव मंडलिक, अनुराधा मंडलिक व मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश भांड म्हणाले की, भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला क्रमांक हा गुळाचा लागतो. गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात. दुधात गुळ घालून ते पिल्याने हाडे मजबूत बनतात. गुळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. गुळ विविध पदार्थांमध्ये गोडवा आणण्याचे काम तर करतोच शिवाय गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असल्याचे गणेश भांड म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम मंडलिक, खंडेराव मंडलिक, सोमनाथ मंडलिक, सुमन मंडलिक, अनुराधा मंडलिक, वर्षा मंडलीक आदींसह मंडलिक कुटुंबीय प्रयत्नशील होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत