कोपरगाव(वेबटीम) पेट्रोल आणि डिजेलच्या वाढिव दरामुळे आज कोपरगाव शहरातील शिवाजी महाराज स्मारका जवळ शहर शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या वि...
कोपरगाव(वेबटीम)
पेट्रोल आणि डिजेलच्या वाढिव दरामुळे आज कोपरगाव शहरातील शिवाजी महाराज स्मारका जवळ शहर शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.या वेळी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे नी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानाचे देखील निषेध करण्यात आला.
यावेळी मुकुंद सीनगर यांनी केंद्र सरकारचा निषेध करत खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून लुटण्याचे काम करून सामान्य जनतेच्या दिशा भूल केंद्र सरकार करत आहे.पेट्रोल डिझेलच्या महागाई वर हे सरकार नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरले आहे. नेहमी रावसाहेब दानवे हे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम करत आहे.
या वेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख कलविंदर दडीयाल,भरत मोरे, अस्लम शेख, इरफान शेख, विशाल ,विक्रांत झावरे, गगन हाडा, नगरसेविक सपना मोरे, वर्षा शिंगाडे, राखी विसपुते, कुकुशेठ सहानी,भूषण पाटणकर, राहुल देशपांडे, सतीश शिंगाने, अक्षय नंनवरे, राहुल होन, मोनू राऊत, प्रफुल्ल शिंगाडे, योगेश मोरे, आकाश कानडे, निशांत झावरे, राहुल हासावल, बाळासाहेब साळूखे, सलीम कांदेवाले, अशोक कानडे, पप्पू देशमुख, गोपाळ वैरागळ, अंबादास वाघ, विजय सोनवणे, गुरमित दडीयाल , सरपंच संजय गुरसळ, आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत