उंबर्‍यात गुलाल आमचाचं ; अशोक ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबर्‍यात गुलाल आमचाचं ; अशोक ढोकणे

 उंबरे ः वेबटीम     उंबरे गावच्या राजकारणात विरोधी गटाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी  सर्व समविचारी लोकांना सोबत घेवून एक तुल्यबळ गट तयार कर...

 उंबरे ः वेबटीम

   

उंबरे गावच्या राजकारणात विरोधी गटाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व समविचारी लोकांना सोबत घेवून एक तुल्यबळ गट तयार करणार आहोत. सध्या या गटाला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा उंबरे गावात धक्कादायक निकाल लागून ग्रामपंचायत आमच्या ताब्यात येईल, असा विश्‍वास अशोकराव ढोकणे यांनी व्यक्त केला.  

     

अशोक ढोकणे म्हणाले,  तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांनी गावचा रखडलेला विकास पाहता आपल्या समविचारी लोकांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. त्याला मोठे यश येताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये चांगले उमेदवार मिळाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक एकचा गुलाल आजच निश्‍चित आहे. आता उवर्रीत चार प्रभागातही तुल्यबळ उमेदवार देवून सर्वच प्रभागात विजय आमचाचं असेल, यासाठी आम्ही या गटातील सर्व घटक पक्षांना समान न्याय देवून त्यांना विचारात घेत आहोत. त्याला नक्कीच यश येणार आहे. यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या सभेत पुराव्यानिशी सत्ताधार्‍यांचे कपडे फाडू, असेही शेवटी ढोकणे म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत