कोपरगावात मैला मिश्रित दूषित पाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात मैला मिश्रित दूषित पाणी

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगरवासियांना मैलमिश्रित ४ ते ६ दिवसाड पाणी किती दिवस पुरविणार असा संतप्त सवाल गावातील हजारो महिला विचारतांना  विद्...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव नगरवासियांना मैलमिश्रित ४ ते ६ दिवसाड पाणी किती दिवस पुरविणार असा संतप्त सवाल गावातील हजारो महिला विचारतांना  विद्यमान नगरपरिषद. प्रशासन पदाधिकारी  व नगरसेवकांच्या विरोधात बोटे मोडीत असल्याचे दृष्य प्रत्येक गल्लीबोळात दिसून येत आहे.

कोपरगाव शहरात १९७१ पूर्वी स्व.वसंतराव सातभाई यांच्या सातभाई वाँटर अँन्ड इलेक्ट्रिक कंपनी मार्फेत दोन वेळा किमान एक ते दोन तासाचे वेळात सर्वाच्च दाबाने पाणी मिळत होते.परंतु हे गोदापात्रातील विहरीतुन उचलले जात असे.गोदापात्रापासुन पाच किलो मीटर परिसरात पाण्यात क्षाराचे प्रमाण सर्वाच्च असल्याने येथील नागरिकांच्या नशिबी खारे पाणी पिण्याचे पाळी येत असल्याने नागरिकांनी प्रंचड आंदोलने केल्यावर गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला यानंतर किमान चार वेळा विस्तारित पाणी पुरवठा योजना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी राबविल्या.परंतु विविध कारणांमुळे व दोन्ही गटातील राजकीय खेळितुन या कोपरगावकरांना कधीच पाणी मिळाले नाही. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दिवसेंदिवस दारणा व गंगापुर धरणाचे गोदावरी डाव्या कालव्यातून मिळणार्या पाण्यात कायम विक्रमी घट होत आहे.तर गोदावरी डाव्या कालव्याने आपली शंभरी केव्हाच पूर्ण केल्यावर या कालव्याचे दुरूस्ती बाबत राज्यशासन कायम उदासीन राहिले आहे.

तर नगरपालिकेच्या चारही साठवण तलावामध्ये गाळ साठणे व पाणी गळतीमुळे दहा दिवसांचे सुध्दा पाणी पुरवठा करतांना नगरपरिषदेचे कायम त्रेधापीठ उडते.त्यात पाटबंधारे खात्याने नगरपरिषदेने १०० दिवसाकरिता साठवण तलाव उभारावा याची शक्ती केली.परंतु नगरोरिषदेने शक्य होत नाही.गोदावरी डाव्या कालव्याचे दोन पाणी आर्वतनातील (पाणी सोडण्याचा)कालावधी दोन ते सहा महिन्या पर्यत वाढविला.याच मुळे जनतेला पाणी पुरेशा प्रमाणात देणे अशक्य झाले आहे.याबाबत आता पर्यत दोन्ही गटांचे एकमेकांचे पाय अोढण्याचे स्पर्धेमुळे या पाणी पुरवठा कामकाजात अनेक अडथळे निर्माण केले आहे.यात बिपिनदादा कोल्हे यांनी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांच्या मदतीने सन.२०३० पर्यत पाणी पुरविणारी विस्तारीत स्वच्छ पाणी पुरवणारी केंद्र शासनामार्फत योजना आणली.परंतु नगरपरिषदेत सत्तात्तरानंतर हे काम बंद पडले.हे एक गुढच आहे.सन.२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरणातून थेट बंद जलवाहिनितुन एक पैसा खर्च करावा लागणार नाही अशी योजना मंजूर घेतली परंतु निविदा काढल्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्या योजनेची वाट लावतांना गोदावरी नांदूर ममध्येश्वर धरणातून थेट जलवाहितुन पाणी योजनेचा डांगोरा पिटविण्यात धन्यता मानली जात आहे.धरणातून नाशिक शहर व धरणाच्या वरील गावांचे मैला व गटातमिश्रीत पाणी कोपरगावकरांना पुरविले जाणार हे किती दिवस पाणी दिले जाणार असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत