कोपरगाव(वेबटीम) बिलोली जि नांदेड येथील मातंग समाजाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला असून या घटनेतील आरोपी विरुद्ध दिशा कायद्...
कोपरगाव(वेबटीम)
बिलोली जि नांदेड येथील मातंग समाजाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला असून या घटनेतील आरोपी विरुद्ध दिशा कायद्याच्या तरतुदी प्रमाणे त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली
या बाबतचे निवेदन लोक स्वराज्य आंदोलन व घटनाकार मैत्री संघ यांच्या वतीने कोपरगाव येथील तहसीलदार यांना देण्यात आले आपल्या निवेदनात पुढे म्हंटले की दि ८/१२/२०२० रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी तसेच पुरोगामी महाराष्ट्रात महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी नुकताच शक्ती व दिशा कायदा करण्यात आला असून सदर प्रकरण या कायद्याच्या तरतुदी खाली चालविण्यात येऊन सदर गुन्ह्याचा निकाल या कायद्याच्या तरतुदीखाली त्वरित लावण्यात यावा तसेच या कायद्याखाली केस चालवताना कायदेशीर बाबीची त्रुटी राहू नये म्हणून या गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे करण्यात येऊन त्या साठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी तसेच या गुन्ह्याच्या तपास कमी सरकारी कर्मचारी पंच म्हणून घ्यावेत त्याचप्रमाणे वैद्यकीय अहवाल व त्या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी
या प्रकरणामुळे समाज बांधवांमध्ये जनक्षोभ निर्माण झाला असून बलात्कार व खून करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ,पीडित महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी मिळावी तसेच या प्रकरणात जलद निकाल लागावा म्हणून बिशेष सरकारी वकील नेमण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे
या निवेदनावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सुजल चंदनशिव, घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, नवनाथ ताकवले, सुरेश मरसाळे, संजय ससाणे आदींच्या सह्या आहेत
दरम्यान हे निवेदन देण्यासाठी समाज बांधव गेले असता तहसीलदार कामात व्यस्त असल्याने व नायब तहसीलदार जागेवर हजर नव्हते किमान निवासी नायब तहसीलदार यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक असते मात्र ते हजर नसल्याने समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे सदर निवेदन अव्वल कारकून भांगरे यांच्या कडे देण्यात आले*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत