मला सामान्य जनतेच्या आशीर्वाद ; तिकीट द्या, जिंकून दाखवतो - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मला सामान्य जनतेच्या आशीर्वाद ; तिकीट द्या, जिंकून दाखवतो

उंबरे ः वेबटीम उंबरे ग्रामपंचायतीसाठी अनेक इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना यामध्ये युवानेते दीपक उर्फ पप्पू ढोकणे यांनीही प्रभाग क्...


उंबरे ः वेबटीम


उंबरे ग्रामपंचायतीसाठी अनेक इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना यामध्ये युवानेते दीपक उर्फ पप्पू ढोकणे यांनीही प्रभाग क्रमांक पाचमधून नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला श्रेष्ठींनी संधी दिल्यास मी निवडून येवू शकतो व गावचा विकास करू शकतो, असा विश्‍वास स्वतः पप्पू ढोकणे यांनी व्यक्त केला आहे.

 

पप्पू ढोकणे म्हणाले, प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व समस्या मला चांगल्या माहिती आहेत. येथील बारा बलुतेदार ही माझी ताकद आहे. येथील तमाम जनतेच्या सुख दुखात मी सहभागी झालेलो आहे. त्यामुळे येथे मला श्रेष्ठींनी उमेदवारी दिली आणि थोडी आर्थिक ताकदही दिली तर माझा विजय कुणीही रोखू शकत नाही. वार्डातील तरूणवर्ग माझ्यामागे खंबीरपणे उभा आहे. तसेच वयोवृद्ध लोकांनीही डोक्यावर हात ठेवल्याने मला आत्मविश्‍वास वाढलेला जाणवत आहे. त्यामुळे श्रेष्ठींनी माझा गांभीर्याने विचार करावा, मला संधी दिली तर उत्तमच, नाही दिली तरीही मी श्रेष्ठी सांगतील ती जबाबदारी पार पाडेल, असेही ढोकणे म्हणाल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत