उंबरे ः वेबटीम राहुरी तालुक्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या उंबरे ग्रामपंचायतीचा रणसंग्राम यंदा चांगलाच गाजणार आहे. निवडणुका जाहीर होताच ये...
उंबरे ः वेबटीम
उंबरे ग्रामपंचायत ही 15 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांची सत्ता आहे. गावच्या राजकारणात तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक सुनिल आडसुरे, माजी संचालक नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग यांचे मोठे राजकीय वजन आहे. या नेत्यांबरोबरच छत्रपती प्रतिष्ठाण, शिवसेना आणि भाजप यांनी देखील या निवडणुकीत उतरण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे.कैलास अडसुरे, विलासराव ढोकणे, लक्ष्मण पटारे, सचिन शेजुळ, तसेच राजेंद्र ढोकणे, प्रा रामकृष्ण ढोकणे, ज्ञानदेव क्षीरसागर, विलासराव गरुड यांच्याकडूनही स्वतंत्र पॅनल करून उमेदवार उभे करण्याची मोर्चे झााली आहे. त्यामुळे सध्या तरी गावात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. यामध्ये राजकीय समिकरणे कशी जुळतात, उमेदवारी कुणाला मिळते ? याशिवाय नाराज आणि बंडखोरांचीही चिंता सर्वच गटांना असणार आहे. त्यामुळेच उंबरेची यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चित्र आहे.
राहुरी तालुक्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या उंबरे ग्रामपंचायतीचा रणसंग्राम यंदा चांगलाच गाजणार आहे. निवडणुका जाहीर होताच येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारीसाठीही जोरदार मोर्चेबांधण्या सुरू झाल्या असतानाही गावातील प्रमुख नेत्यांमध्येही ‘युती’ बाबत समविचारी गटाबरोबर चर्चांना सुरूवात झाली आहे.
उंबरे ग्रामपंचायत ही 15 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांची सत्ता आहे. गावच्या राजकारणात तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक सुनिल आडसुरे, माजी संचालक नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग यांचे मोठे राजकीय वजन आहे. या नेत्यांबरोबरच छत्रपती प्रतिष्ठाण, शिवसेना आणि भाजप यांनी देखील या निवडणुकीत उतरण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे.कैलास अडसुरे, विलासराव ढोकणे, लक्ष्मण पटारे, सचिन शेजुळ, तसेच राजेंद्र ढोकणे, प्रा रामकृष्ण ढोकणे, ज्ञानदेव क्षीरसागर, विलासराव गरुड यांच्याकडूनही स्वतंत्र पॅनल करून उमेदवार उभे करण्याची मोर्चे झााली आहे. त्यामुळे सध्या तरी गावात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. यामध्ये राजकीय समिकरणे कशी जुळतात, उमेदवारी कुणाला मिळते ? याशिवाय नाराज आणि बंडखोरांचीही चिंता सर्वच गटांना असणार आहे. त्यामुळेच उंबरेची यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत