देवळाली प्रवरा(वेबटीम) चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठाण व झी टॉकीज वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.बबनराव गणपतराव भांड य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठाण व झी टॉकीज वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.बबनराव गणपतराव भांड यांच्या स्मरणार्थ "गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा" कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती चैतन्य उद्योग समुहाचे चेअरमन गणेशराव भांड यांनी दिली.
स्व.बबनराव गणपतराव भांड यांच्या स्मरणार्थ चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठाण व झी टॉकीज वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा कीर्तन महोत्सव दि.१० डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या दरम्यान दररोज ३ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली असून ती श्रवण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. किर्तन महोत्सावातील किर्तनाचे चित्रीकरण करण्यात येत असुन त्यासाठी २५ लोकांची टिम कार्यरत आहे.किर्तनास साथ संगत करणारे गुणिजन कलावंत आहेत.किर्तनासाठी मोठा सेट उभारण्यात आला आहे. या कीर्तनाचे झी टॉकीज वाहिनीवर प्रक्षेपण केले जाणार आहे.
किर्तन महोत्सवात सकाळी १० ते १२,दुपारी- २ ते ४,सायंकाळी-७ ते ९ या वेळेत देवळाली प्रवरा येथील चैतन्य मिल्क, भांड वस्ती येथे नामवंत किर्तनकारांचे किर्तन होणार आहे.किर्तन श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब भांड, संदिप भांड व चैतन्य उद्योग समुह अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत