राहूरी(वेबटीम) छावा क्षात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांचा पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.निलेश लंके यांच्या हस्ते ...
राहूरी(वेबटीम)
छावा क्षात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांचा पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.निलेश लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सामाजिक कामात अग्रेसर असणारी छावा क्षात्रविर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान दादा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला एक वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सौदागर यांचा पारनेर तालुक्याचे आमदार श्री निलेश लंके साहेब यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त सत्कार केला. यावेळी आ.निलेश लंके यांनी सौदागर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांनी संघटनेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर यांनी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या संघटनेच्या प्रथम अधिवेशनाचे आमंत्रण दिले. प्रसंगी सर्व छावा क्षात्रवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत