राहुरी : वेबटीम फेब्रुवारी २०२० मधे घेण्यात आलेल्या इ ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत श्री शाहु विदया मंदिर खडांबे ता रा...
राहुरी : वेबटीम
फेब्रुवारी २०२० मधे घेण्यात आलेल्या इ ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत श्री शाहु विदया मंदिर खडांबे ता राहुरी शाळेचा विदयार्थी वेदांत राहुल लोंढे याने २१८ गुण मिळवून जिल्हास्तरीय स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत १७८ वा व राहुरी तालुकास्तरीय स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत ६ वे स्थान पटकावले तसेच वेदांत लोंढे या विदयार्थ्याने इ ५ वीच्या मंथन राज्यस्तरीय परीक्षा हिंद सेवा स्टूडंट टॅलेंट परीक्षा डॉ सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षेत जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत स्थान पटकावले
शालेय जीवनात कठीण समजल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेत वेदांत लोंढे याला श्री शाहू विदयामंदिर खडांबे शाळेचे शिक्षक कुऱ्हे जी ए एम चौधरी पी आर डंमरे एम एम साठे पी पी माध्यमिक शिक्षक संघटना सचिव आप्पासाहेब शिंदे पर्यवेक्षक अकोलकर व्ही बी मुख्याध्यापक कांडके ए एम आदी यांचे मार्गदर्शन लाभले
वेदांत लोंढे हा जि प शाळा वांबोरी स्टेशन शाळेचा माजी विदयार्थी असून माजी मुख्याध्यापक महादेव बाळासाहेब लोंढे यांचा नातू आहे
त्याच्या या यशाबदद्ल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय लक्ष्मण पवार व सदस्य तसेच राहुरी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके खडांबे गावचे सरपंच कानिफनाथ कल्हापूरे उपसरपंच गणेश पारे माजी उपसरपंच अर्जुनराव खळेकर प्रभाकर हरिश्चंद्रे आदीनी अभिनंदन केले.
या यशाबद्दल परिसरातून कौतूक होत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत