शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने दि.३१ डिसेंबर...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने दि.३१ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या कालावधीत मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प आयोजित केला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिली.

 राहूरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील आदिनाथ सर्व्हिस स्टेशन शेजारी दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत हा कॅम्प आयोजित केला आहे.

या कॅम्पमध्ये  नवीन मतदान कार्ड नोंदणी,मतदान कार्ड दुरुस्ती,डिजीटल मतदान कार्ड नोंदणी करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिनाथ कराळे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत