कोपरगावात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कोपरगाव ( प्रतिनिधी )  कोपरगाव शहरातील प्रगत शि वाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व मित्र फाऊंडेशन यांच्यावतीने क्रिकेटची पंढरी असलेल्या बाजारतळ ये...

कोपरगाव ( प्रतिनिधी ) 

कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व मित्र फाऊंडेशन यांच्यावतीने क्रिकेटची पंढरी असलेल्या बाजारतळ येथील जय लक्ष्मी आई स्टेडियम येथे ६ जानेवारी २०२१ पासून भव्य राज्यस्तरीय क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

    या स्पर्धासाठी इच्छुक संघांनी दि. ५ जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश शुल्क भरून नोंदणी करणे गरजेचे आहे. सदर स्पर्धा या ६ जानेवारी पासुन कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील जय लक्ष्मी आई स्टेडियम येथे होणार आहेत. या स्पर्धेत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. प्रत्येक सामना हा ६ शटकांचा असणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास ३१,०००, द्वितिय विजेत्या संघास २१,००० व तृतिय विजेत्या संघास ११,००० चे रोख पारीतोषिक देण्यात येणार आहे. 

तसेच इतरही अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी राज्यातील संघांनी १५०१ रुपये प्रवेश फी देऊन नाव नोंदणीसाठी रवींद्र भुजबळ, भूषण नरोडे, रवींद्र डमाळे, महेश आमले, विक्रांत कुदळे, संदीप सावताडकर, आलोक तिवारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष या मैदानावर क्रिकेटचे सामने होत आहेत. मधील काही काळ हे सामने बंद होते.

 परंतु यंदापासून पुन्हा हे क्रिकेटचे सामने सुरु झाल्याने तरुणांसह शहर वासियामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत