सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करा, राष्ट्रवादी युवकचे निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करा, राष्ट्रवादी युवकचे निवेदन

देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील सार्वजनीक सुलभ शौचालयाची डागडुजी करून नियमित सुरू कर...

देवळाली प्रवरा

देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील सार्वजनीक सुलभ शौचालयाची डागडुजी करून नियमित सुरू कराव्यात अशी मागणी २८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष विक्रांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून नागरिकांना असुविधाचा सामना करावा लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या शौचालयाची दयनीय अवस्था झाली असून नगरपालिका व येथील स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सदरील ठिकाणी पाणी व विजेचा अभाव दिसून येत असून येथील पुरुष व महिलांना उघडयावर शौचालयास जावे लागत आहे.

  प्रसादनगर येथील शौचालय घाणीच्या विळख्यात सापडले असून त्याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सागर उल्हारे, मयूर कदम , यशोदीप पंडित,आशु सांगळे, सुरज विधाते, सोनू आल्हाट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत