उंबरे : वेबटीम उंबरे गावच्या राजकारणात बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे. दुर्दैवाने यात यश आले नाही, तर मी कुुुणा सोब...
उंबरे : वेबटीम
उंबरे गावच्या राजकारणात बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे. दुर्दैवाने यात यश आले नाही, तर मी कुुुणा सोबत जायचे याचा योग्य निर्णय घेणार आहेच. मात्र प्रसंगी 70 उमेदवारी अर्जापैकी 15 नवीन व सुुशिक्षीत इच्छुकांना सोबत घेवून स्वतंत्र पॅनलही करू शकतो, हे देखील कोणी विसरू नये, असे भाष्य माजी संचालक नवनाथ ढोकणे यांनी वर्तवल्याने गावात राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवनाथ ढोकणे यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे. असो, या माध्यमातून नवनाथ ढोकणे पुन्हा एकदा गावच्या राजकारणात सक्रिय होत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
नवनाथ ढोकणे म्हणाले, गावचा विकास व्हावा, अशी सर्वच नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुक करण्यासाठी सर्वच अनुकुल असल्याची मला खात्री आहे. त्यासाठी आपण व्यक्तीशः सर्वच पॅनल प्रमुखांशी चर्चा करत आहोत. त्याला प्रतिसादही चांगला भेटत आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही. मात्र, दुर्दैवाने यात अपयश आले तर आपण योग्य ती भूमिका जाहीर करणार आहे. कदाचित आपण या निवडणुकीत तटस्थ राहू किंवा चांगल्या लोकांना मते टाकू, त्यांच्यासाठी मतेही मागू आणि याशिवाय ठरवलं तर सध्याच्या 70 इच्छुकांपैकी 15 इच्छुकांना सोबत घेवून स्वतंत्र पॅनलही करू शकतो, असेही भाष्य केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
ढोकणे यांचा गावात मोठा दबदबा आहे. त्यांना मानणारा तरूणवर्ग मोठ्या संख्येने आहे. नवीन मतदारही त्यांच्याकडे आकर्षिला आहे. कदाचित, नवनाथ ढोकणे यांनी अशाप्रकारे स्वतंत्र पॅनलची तयारी केली तर गावच्या राजकारणाला वेगळेच वळण मिळणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत