राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नी सर्वतोपरी सहकार्य करू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नी सर्वतोपरी सहकार्य करू

राहूरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंड...

राहूरी(वेबटीम)

राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय  शिष्टमंडळाला दिले. 

    आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे,  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे आदींनी आज दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ०९.०० वा.  खासदार सदाशिव लोखंडे यांची वळद उंबरगाव येथे त्यांचे निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. 

नगर मनमाड महामार्गावर  राहुरी फॅक्टरी येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना धोकादायक अवस्थेत  रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते, तसेच तहाराबद श्रीरामपूर रस्ता चौकात रहदारीचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून याठिकाणी अपघातही वाढले आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भुयारी मार्ग होणे आवश्यक आहे. 

  नगर मनमाड महामार्ग केंद्र सरकारच्या ताब्यात गेला असून त्यासाठी केंद्राने नुकताच निधी मंजूर केल्याने लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे वरील दोन ठिकाणी भुयारी मार्गाची तरतूद करण्यात यावी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनील कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष बाळासाहेब खांदे,  राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, साईसेवा निधी संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे, नगरसेवक आदिनाथ कराळे आदी सर्वपक्षीय नागरिकांची  स्वाक्षरी असलेले निवेदन शिस्टमंडळाने शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे  यांना उंबरगाव येथील निवासस्थानी दिले त्या प्रसंगी बोलताना  खासदार लोखंडे यांनी या भुयारी मार्गाच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत