देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील स्व.रामदास पाटील धुमाळ विचार विचार मंचचे अध्यक्ष अमृतराव धुमाळ तसेच रामदास पाटील धुमाळ यांचे चिर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील स्व.रामदास पाटील धुमाळ विचार विचार मंचचे अध्यक्ष अमृतराव धुमाळ तसेच रामदास पाटील धुमाळ यांचे चिरंजीव अजित धुमाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रामदास पाटील धुमाळ यांचा विचार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा स्वाभिमान जागृत करणारा होता. त्यावेळी त्या परिस्थितीत त्यांनी थोर पुढारी डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली होती. अत्यंत कमी कार्यकर्ते घेऊन रामदास पाटील यांनी बाबुराव तनपुरे यांना शह देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात त्यांना प्रचंड यशही आले कोणताही सत्ताधारी व्यक्ती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय देऊ शकत नाही, हे सत्य आहे फार काळ सत्ता भोगून देखील जवळचे कार्यकर्ते उपेक्षित राहिलेले उदाहरणे राहुरी तालुक्यात नवीन नाहीत.
मुळा भंडारदऱ्याच्या पाण्याने समृद्धी पावलेला राहुरी तालुका येथील कार्यकर्ता संपन्नतेच्या जोरावर कोणाच्याही विरोधात उभे राहण्यास मागेपुढे पाहत नाही. ही हेच त्यावेळी हेरून प्रत्येक कार्यकर्त्याचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी रामदास पाटील धुमाळ यांनी विकास मंडळाच्या माध्यमातून जागृती मंडळाच्या माध्यमातून समवयस्कर यांना बरोबर घेऊन तालुक्यातील राजकारण सतत हलते ठेवले होते. त्यात राहुरी कारखाना असो मुळा प्रवरा संस्था असो राहुरी सूतगिरणी असो या शैक्षणिक संस्था व अन्य अनेक संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम धुमाळ यांनी केले होते. आजही रामदास पाटील धुमाळ यांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांचे कार्यकर्ते , रावसाहेब पाटील साबळे यांचे कार्यकर्ते चंद्रशेखर पाटील कदम यांचे कार्यकर्तेभक्कमपणे विविध ठिकाणी उभे आहेत ते रामदास पाटील धुमाळ व विकास मंडळाला कधीही विसरू शकत नाहीत.
आजही बोलताना रामदास पाटील धुमाळ हे व्यक्ती नव्हते तर तो एक विचार होता सर्वांना उभे राहण्याची ताकद देणारा विचार होता अशी चर्चा ऐकायला मिळते. काल रामदास पाटील धुमाळ यांचे पुतणे अमृत धुमाळ व चिरंजीव अजित धुमाळ राहुरीचे माजी संचालक ज्ञानेश्वर कोळसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नामदार बाळासाहेब थोरात यांचे आणि धुमाळ कुटुंबीय यांचे संबंध तसेच जुने परंतु काळाच्या ओघात वेगवेगळे बदल होत गेले काही ठिकाणी विसंगती निर्माण झाली . बराच काळ निघून गेला आज तालुक्यातील राजकीय स्थिती पाहता तालुक्याला राहुरीच्या ३२ गावांना कोणीही वाली नसल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या मातृ संस्थेवर इतर तालुक्यातील नेतेमंडळीचे वर्चस्व आहे. यात शेतकरी कामगार शेतमजूर कार्यकर्ता ,व्यापारी यांचा स्वाभिमान प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दुखावला जात आहे हे नाकारून चालणार नाही .
अमृत धुमाळ यांनी पुन्हा एकदा या दुखावलेल्या चिडलेल्या घुसमट सुरू असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन पुन्हा एकदा तालुक्यात स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे चित्र आहे . सध्या धुमाळ यांच्याकडे कोणतीही सत्ता नसल्याने यांच्या विचाराचे खिल्लीही उडवली जाऊ शकते. परंतु विचार हा नेहमी यशस्वी होत असतो हा सिद्धांत आहे कालच्या अमृतमय यांच्या काँग्रेस प्रवेशावर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अमृत धुमाळ नेमकं करतात तरी काय असे प्रश्न अनेक कार्यकर्त्यांनी विचारले कधी राष्ट्रवादी कधी तनपुरे आणि आता काँग्रेस यानंतर आता दुसरीकडे जाणार तर नाहीना अशीही चर्चा आहे
परिणाम अमृत धुमाळ हे स्वर्गीय रामदास धुमाळ यांचे पुतणे आहेत.चाचा तनपुरे अध्यक्ष असलेले विकास मंडळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. तालुक्यात सध्या परिवर्तन मंडळाची हवा आहे,अमृत धुमाळ व अजित धुमाळ यांच्या या भूमिकेमुळे नानांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्ते सध्या तरी संभ्रमित आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत