उंबरेत सत्ताधार्यांना तरूणांनी फोडला घाम ; जनतेमध्ये सुप्त लाट तयार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत सत्ताधार्यांना तरूणांनी फोडला घाम ; जनतेमध्ये सुप्त लाट तयार

 उंबरे : आर. ढोकणे       उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून, निवडणुकीपूर्वीच साहेबराव दुशिंग यांच्या नेतृत्वाखालील गणरा...

 उंबरे : आर. ढोकणे      


उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून, निवडणुकीपूर्वीच साहेबराव दुशिंग यांच्या नेतृत्वाखालील गणराज मंडळाने एक जागा बिनविरोध जिंकत सत्ताधार्यांना चपराक दिली आहे, दरम्यान, पाच वर्षात जनतेने खूप काही भोगलय, खूप काही सोसलं आहे, महिलांची पाण्यासाठी मोठे हाल झाले, तरुणांना येथे अपेक्षित विकास होताना दिसत नाही, त्यामुळे यंदा परिवर्तन करण्यासाठी जनतेत सुप्त लाट तयार झाली असून कितीही पैशांचा पाऊस झाला तरी स्वाभिमान विकायचा नाही, पैसे घेऊ पण यंदा चूक करणार नाही, मत चांगल्या लोकांना देऊ, घराणेशाही मोडीत काढू, अशी प्रतिज्ञा जनतेतून केली जात आहे
.

उंबरे ग्रामपंचायतीची 15 जागांसाठी निवडणूक होत आहे. सत्ताधारी गटाविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत, मागील पाच वर्षात झालेला पैशांचा अपहार,  विद्यार्थ्यांची शालेय दाखल्यासाठी केलेली अडवणूक, गावातील तरुणावर दाखल केलेले गुन्हे,  14 व वित्त आयोगाच्या रकमेवर मारलेला डल्ला, मुरूम विक्रीतील घोटाळा, स्मशानभूमी झाडांची तस्करी, शालेय साहित्य घोटाळा, अंगणवाडी साहित्य घोटाळा, माळवाडीची अडीच लाखाची गायब गटार योजना, ठेकेदार आणि टक्केवारीची घातलेली सांगड, कोरोना संकटात गोरगरिबांना आलेला किराणा वाटप न करता ग्रामपंचायतीमधून काढलेले बिले, दिवलीची बोगस लाईट बिले, यासह अनेक च्चुकीच्या काामाचा आरसा विरोधक जनतेला पुराव्यासह दाखवणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागून राज्यात खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही, दरम्यान, प्रभाग क्रमांक पाचमध्ये सत्ताधारी मंडळाकडून युवा उमेदवार संजय अडसुरे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विराधात गणराज मंडळाचे युवा नेते बाबासाहेब ढोकणे मैदानात आहेत, महिला सर्व साधारण मधून सत्ताद्धारी मंडळाच्या कविता बाळासाहेब ढोकणे यांना उमेदवारी आहे, तर विरोधात नीता यशवन्त ढोकणे उभ्या आहेत, ओबीसी महिला या मागासवर्गीय जागेवर सत्ताधारी मंडळाकडून ऐनवेळी येथे रतनताई नामदेवराव ढोकणे या देखील लढू शकतात, मात्र ही जागा ओबीसींची असल्याने कदाचित ही जागा मूळ ओबीसी व या जागेवर हक्क असलेल्या ओबीसी समाजाला म्हणजे पुनमताई गोरे यांनाचं भेटू शकती. या विरोधात गणराज मंडळ यांनी ही जागा मूळ ओबीसी सोनाली शेजुळ यांना दिली आहे,त्यामुळे या मागासवर्गीय जागेवर नेमके येथे कोण लढणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. असो सुरुवातीलाच विरोधी मंडळाने जेष्ठ नेते साहेबराव दुशिंग, गंगाधर दादा ढोकणे, चेअरमन कारभारी ढोकणे, इंजि गोरक्षनाथ दुशिंग, प्रा रामकृष्ण ढोकणे सर, युवानेते संदीप दुशिंग, अशोक ढोकणे आदींच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 1 मधून सौ सारिका रामकीसन ढोकणे या बिनविरोध निवडणून आल्याने 15 पैकी 1 ने आघाडी घेतली आहे, जनतेचा मिळणार प्रतिसाद व तरुणाांां सहभाग पाहता उंबरेत यंदा ऐतिहासिक निवडणूक होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत