उंबरे ः वेबटीम यंदा कुणाच्या नादी लागू नका, मोठी कामे आम्हीच करू शकतो. यावेळी तुम्हाला घरकुल नक्की देवू, शिवाय तुमच्या घरातील चार मतांना...
उंबरे ः वेबटीम
यंदा कुणाच्या नादी लागू नका, मोठी कामे आम्हीच करू शकतो. यावेळी तुम्हाला घरकुल नक्की देवू, शिवाय तुमच्या घरातील चार मतांना 40 हजार रुपये देतो, असे म्हणणार्या एका गटाच्या कार्यकर्त्याला संबधित महिलेने चांगलीच चपराक लगावली. आमची किंमत करू नका, आम्ही भिकारी नाहीत, भर पावसाळ्यात घरात पाणी घुसले, चारवेळा ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे मारले पण मुरूम टाकला नाही. तव्हा तर आमच्याकडे कुणीच आलं नाही, आता मतं मागायला आले होय. आता तुमचे पैसेही नको, आणि आमच्या दारात पण येवू नका, अशा शब्दात त्या महिलानी आपली भावना व्यक्त केल्याने ही चर्चा गावात वार्यासारखी पसरली आहे, यावेळी हा प्रकार पाहून अनेकांना गुदगुल्या झाल्या.
उंबरे गावात सध्या दोन्ही पार्ट्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. गणराज शेतकरी मंडळाने सोशल मिडीया आणि प्रत्यक्ष भेटी गाठी घेवून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी विरोधी मंडळाचाही प्रचार सुरू आहे. मात्र, एका कार्यकर्त्याने काल सायंकाळी 7 वाजता एका घरी आपल्या उमेदवारासाठी हात जोडले असता त्याला तिथे वेगळाच साक्षात्कार झाला. याबाबत अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटूंबाला अनेक वर्षापासून घरकुलाचे आश्वासन दिले जात आहे. यावेळीही पुन्हा तेच आश्वासन दिले गेले. त्यामुळे संतापलेल्या महिला भगिणीने त्या कार्यकर्त्याचा समाचार घेतला. आम्हाला घरकुल नको, मागंही एकाला पैसे दिले पण घरकुल आलचं नाही, आता पार घरात पाणी घुसले होते त्यावेळीही कुणाला आमची आठवण झाली नाही. मग आता मतं मागायला आले होय का? असा सवाल केला. यावेळी त्या कार्यकर्त्याने ताई पैसे घ्या, तुमच्या चार मताला 40 हजार देतो, असे आमिष दाखवले. पण तिने आणखी संतापून आम्ही इतके पण लाचार नाही भो, आम्हाला पैसे नको, आणि आमच्या दारात पण परत येवू नका, आम्ही ठरवू कुणाला मत द्यायचं, तु उमेदवार आहे का, तुला मत देईल पण तु कशाला दुसर्याची वकीली करतो. उमेदवार माझ्या दारात येवू द्या, मग त्यांनाच सांगू काय ते ? अशा शब्दात मतदारांच्या भावना असल्याची कुणकुण गावात ऐकायला मिळत आहे. दरम्यान, पैसे मिळत असतानही मोठ्या हिमतीने लाचारी न पत्करणारी ती रणरागिणी महिला कोण ? ती कोणत्या प्रभागातील व 40 हजारांचे आमिष दाखवणारा कार्यकर्ता कोण ? तो सत्ताधारी कि विरोधी मंडळाचा ? याविषयीही गावात जोरदार चर्चा सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत