सत्तेला चिकटून बसणारे आम्ही नाहीत; दत्ताञय खुळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सत्तेला चिकटून बसणारे आम्ही नाहीत; दत्ताञय खुळे

वळण / गोविंद फुणगे      सत्तेला चिकटून बसणारे आम्ही नाहीत म्हणून सर्वाना सत्तेत समसमान संधी दिली आहे.पाच वर्षात गावात विकास कामे केली असुन आ...

वळण / गोविंद फुणगे 

    सत्तेला चिकटून बसणारे आम्ही नाहीत म्हणून सर्वाना सत्तेत समसमान संधी दिली आहे.पाच वर्षात गावात विकास कामे केली असुन आगामी काळात देखील नामदार प्राजक्त तनपुरे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे प्रदिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताञय खुळे केले आहे.ते वळण(ता.राहुरी) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक प्रचार नारळ शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 

             राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडुकीची रनधुमाळी सुरू झाली असुन जनसेवा मंडळ आणि परिवर्तन मंडळ  अशी तुल्यबळ लढत होत आहे.शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी जनसेवा  मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद खुळे हे होते.तर प्रमुख उपस्थितीत जनसेवा मंडळाचे बी.आर.खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बाळासाहेब खुळे,अशोक कुलट,बाळासाहेब शिंदे यांसह उमेद्वार एकनाथ खुळे, विमल रोहिदास  रंधे,शोभा रोहिदास आढाव, संजय शेळके,संजिवणी लक्ष्मण खिलारी, सुरेश मकासरे, आशाबाई दत्ताञय खुळे, सुभाष ठाकर,पुजा परसराम फुणगे ,लिलाबाई सिताराम गोसावी गोसावी आदिंसह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे यांनी सांगितले की,विरोधकांनी पुढील कालावधीत पिण्याचे पाणी बंद होणार असल्याची टिका केली आहे. 

पण मी तुम्हाला खाञी देतो की पुढील कालावधीत कधीही पिण्याचे पाणी बंद होणार नाही तसेच राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जनसेवेचे कार्यकर्ते काम करत असताना गावात विद्युत ट्रान्सफार्मर तसेच रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले तसेच आगामी काळात देखील विकास कामांची घोडदौड हि सुरूच ठेवु असे आश्वासन खुळे यांनी यावेळी  दिले आहे.

तर माजी सरपंच अशोक कुलट यांनी बोलताना सांगितले की,सिमेंट बाॅल्क,क्राॅक्रिटचे रस्ते हे कोणी केले असे आरोप आमच्यावरती झाले पण आम्ही तुमच्या विश्वासाला कधीही  तडा जावु दिला नाही आणि पुढील पाच वर्षात तडा जावू देणार नाही तसेच विकास कामे हि दुपटीने करू अशी ग्वाही दिली आहे.सुत्रसंचालन उमेश खिलारी यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर खुळे यांनी मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत