उंबरे : वेबटीम आमची पिढी गेली , आता आमच्या पोरांची पिढी चालली, पण आमच्या बायका-सुनाच्या डोक्यावरचा हंडा काय या लोकांना उतरवता आला ...
उंबरे : वेबटीम
आमची पिढी गेली , आता आमच्या पोरांची पिढी चालली, पण आमच्या बायका-सुनाच्या डोक्यावरचा हंडा काय या लोकांना उतरवता आला नाही, त्यामुळे आता आमचं ठरलं, यावेळी दुसऱ्यांचे पैसे घेऊ पण आमचं मत गरीबांना देऊ, असा सूर प्रभाग पाच मधील जनतेतून ऐकायला मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी पेरलेले सुरुंग आता खुद जनतेनेच पेटवल्याची दिसत आहेत.
प्रभाग पाचमध्ये बाबासाहेब ढोकणे यांचे चिन्ह बस आहे, सोनालीताई गोरक शेजुळ यांचे चिंन्ह गॅस टाकी आहे, आणि नीता यशवंत ढोकणे यांचे चिन्ह नारळ आहे, प्रभाग पाचमध्ये प्रचार करत असताना गोरगरीब जनता स्वयंस्फूर्तीने गणराज शेतकरी मंडळाच्या उमेदवारांना प्रतिसाद देत आहे. प्रत्येक घरी उमेदवाराला चहा पिण्याचा आग्रह सुरू आहे, गेल्या पाच वर्षात गावात फकत पैसे खायचे उद्योग झाले, काम काहीच झाले नाही, यांना पाणी प्रश्न सोडवता आला नाही, महिलांच्या डोक्यावर हंडे कायम आहेत, गावातील रस्ते धड झाले नाही, गावात शिक्षण, आरोग्य चांगली सुविधा नाही, स्वछता, साफसफाईचा प्रश्न कायम आहे, निधी येतो पण जातो कुठं हेच जनतेला समजेना, जिकडे तिकडे नुसतं खायला लागत, आशा शब्दात जनतेतून सत्ताधारी मंडलाविषयी खदखद ऐकायला मिळत आहेत, याशिवाय यावेळी त्या लोकांनी कितीही पैसा देऊद्या, पण त्यांचे पैसे घेऊ पण मत तुम्हाला देऊ, आशा शब्दात जनतेतून मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक पाचमध्ये यावेळी धक्कादायक निकाल लागून धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत