कोपरगाव शहर व तालुक्यातील बेकायदेशीर धंदे बंद करावे*- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहर व तालुक्यातील बेकायदेशीर धंदे बंद करावे*- अँड.नितीन पोळ

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर व तालुक्यातील दारू मटका,जुगार कॉइन लॉटरी आदी बेकायदा धंदे बंद करावे अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना एका ल...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहर व तालुक्यातील दारू मटका,जुगार कॉइन लॉटरी आदी बेकायदा धंदे बंद करावे अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना एका लेखी निवेदनाद्वारे लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी केली आहे.

आपल्या निवेदनात  पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारू,मटका,जुगार कॉइन बॉक्स मटका ऑनलाईन जुगार सुरू असून यात कोपरगाव शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी आहेत मात्र त्यामुळे कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी या बेकायदेशीर व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शहर व तालुक्यात हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत यापूर्वी देखील या  बेकायदेशीर व्यवसायावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते व छोट्या मोठ्या कारवाई केली होती.

गेल्या आठ दहा महिन्या पासून करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन असल्याने अनेक नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत त्यामुळे या आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी अनेक जण शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू मटका,जुगार या व्यवसाया कडे वळत आहेत तरी हे बेकायदा व्यवसाय त्वरित बंद करावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत