वळण /गोविंद फुणगे राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडुकीचा प्रचार अंतिम टप्प्...
वळण /गोविंद फुणगे
ग्रामपंचायत निवडणुत जनसेवा आणि परिवर्तन अशी सरळसरळ लढत होत असुन दोनही मंडळात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नशीब अजमावत आहे.म्हणून कोणता एक पक्ष किंवा कोणत एक मंडळ अशी एक ओळख दोन्ही मंडळात दिसत नाही.कारण जनसेवा मंडळ म्हणून नामदार प्राजक्त तनपुरे, विखे गट म्हणून खासदार सुजय विखे पाटील , कर्डिले गट म्हणून आमदार शिवाजी कर्डिलेंसह शिवसेना गट म्हणून रावसाहेब खेवरे अशा प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्तेसह नवखे उमेद्वार हे दोनही मंडळात आमने-सामने निवडणूक रिंगणात ऊभे ठाकले आहेत त्यामुळे कुणा एका पक्षाचे मंडळ म्हणून हि निवडणूक होणार नसुन केवळ उमेद्वार पाहुन मतदान होणार असल्याची देखील चर्चा होत आहे. कारण वळण गावात राजकारण हे आटीतटीचे होत नसुन खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचा तसा इतिहास आहे कारण गावात सोयरे-धायरे आणि भाऊबंध यावर अधिक बर दिला जातो.पाहुणे-रावळेंसह भाऊबंध यांचे अधिक मोठे जाळे गावात पसरलेले आहे.त्यामुळे पार्टी-पक्षापेक्षा उमेद्वार पाहुनच मतदान होणार असल्याची मत राजकीय विश्लेशकांकडुन व्यक्त केले जात आहे.आता पार्टी पक्षाच्या पल्याकडे हे मते मिळविण्यासाठी कोणात्या उमेद्वाराला यश मिळावता ये निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
*केवळ मैञिच्या जाळ्यावर एका उमेद्वारांचा बोलबोला!*
गावात सोयरे-धायरे,भाऊबंद या गणितावर मोठे राजकारण होत असल्याचा इतिहास आहे.परंतु यावेळी जनसेवा च्या क्षेष्ठींनी मनाचा मोठेपणा दाखवून एका नवख्या उमेद्वाराला केवळ त्यांच्या मैञिच जाळ पाहुन उमेद्वारी दिली आहे. आणि त्याच उमेद्वारांचा देखील गावात मोठा बोलबोला बघवयास मिळत आहे.तसा त्या उमेद्वारांचा प्रचार हि मिञांच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात होत असुन जात-पात,सोयरे-धायरे,भाऊबंदकीच्या पलिकडे मैञिच्या नात्यात काय ताकत असती याचा उत्तम उदाहरण निकालानंतच स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत