वळण (प्रतिनिधी) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सर्वांनी सहाय्य करावे म्हणून निधी समर्पण अभियानास मानोरी (ता.राहुरी) येथे प्रारंभ ...
वळण (प्रतिनिधी)
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सर्वांनी सहाय्य करावे म्हणून निधी समर्पण अभियानास मानोरी (ता.राहुरी) येथे प्रारंभ करण्यात आला आहे.या मंदिर उभारण्यासाठी भीमराज वाघ,ताराबाई वाघ यांच्याकडुन १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिली तर यासह गावातील रामभक्तांनी २ लाख ६७ हजार ७८१ रूपयांची तर गुप्तदान म्हणून ११हजार रूपयांची देणीगी संयोजकांकडे सुपूर्त करण्यात आली.
५ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यत घरोघरी जाऊन हा निधी समर्पण अभियानास प्रारंभ देखील करण्यात आला.प्रसंगी आपण समाजासाठी काय देतो याला महत्व नाही तर किती देतो याला महत्व आहे.त्यामुळे मंदिर हे कुणी एकट्याने बांधले तर त्याचे नाव होईल म्हणून या मंदिर उभारण्यासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा व्हावा म्हणून निधी समर्पण अभियान कार्यक्रम करण्यात येत असल्याचे प्रतिपादन बाळकृष्ण महाराज कांबळे यांनी केले.यावेळी प्रसंगी रमेशनंदगिरी महाराज,लक्षण महाराज चौगुले,किशोर महाराज जाधव आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच आब्बास शेख,प.स.सदस्य रविंद्र आढाव, तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव,निवृत्ती आढाव,बाळासाहेब वाघ,उत्तम खुळे, शिवाजी थोरात,बाजीराव आढाव,डाॅ.बाबासाहेब आढाव,बांपुसाहेब वाघ,किशोर निर्मळ,समीर धीमते,शिवप्रसाद पवार,भारत निमसे,आण्णासाहेब तोडमल,राहुल वाकचौरे,भिष्मा विधाटे,हरीभाऊ आढाव, आदिसह रामभक्त उपस्थित होते. महेश शेळके यांनी सुञसंचालन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत