उंबरे : वेबटीम जनता आता हुशार झाली आहे. त्यांना सगळं कळतंय, ही गरीब विरोधात श्रीमंतांची आणि सत्य विरोधात असत्याची लढाई आहे, त्यामुळे काळ...
उंबरे : वेबटीम
जनता आता हुशार झाली आहे. त्यांना सगळं कळतंय, ही गरीब विरोधात श्रीमंतांची आणि सत्य विरोधात असत्याची लढाई आहे, त्यामुळे काळजी करू नका, यात सत्याचाच विजय होणार, पैसे कितीही वाटू द्या, पण मतदान करताना आम्ही जे करायचं तेच करणार, अशी भूमिका मतदारांनी घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत इतिहास घडण्याची खात्री वाटू लागली आहे. दरम्यान, मतदारांनी ज्या दिवशी निवडणूक लागली, त्याच दिवशी आपलं मत कोणाला द्यायचे हे ठरवले आहे, शिवाय, पैसाने मानस विकत घ्यायची, भाषा वापरली जात असल्याने मतदारांचा स्वाभिमान जागा झाला आहे.
उंबरेत विकासाच्या नावाखाली गाव भकास करण्याचे उद्योग सत्ताधार्यांनी केले आहे, त्यामुळे या निवडणुकीत बदल घडविण्यासाठी तरुण पुढे आले आहेत. यातून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, जेष्ठ वर्गाने देखील आपली ताकद गणराज शेतकरी मंडळाला दिली आहे, त्यामुळे ही निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची बनली आहे. तरुणांनी ही निवडणूक हाती घेतल्याने सत्ताधार्यांना घाम फुटला आहे, त्यामुळे निवडणूक हातातून जाण्याची भीती सातधार्यांना वाटू लागली आहे, त्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सत्ताधारी कामाला लागले आहेत, पैशापुढं भूत नाचतात, असे ते बोलून दाखवत आहेत, मात्र गोरगरीब माणूस हा भूत नाही , तो देखील स्वाभिमानी आहे, त्याला देखील आपल्या मुलांचे भवितव्य घडवायचे आहे, त्यामुळे त्याला इतके लाचार समजू नये, अशी भावना आता समोर येत आहे, हे सर्व जनता जागी झाल्याची लक्षण असून हाच स्वाभिमान मतामधून क्रांती घडवेल, असा विश्वास दर्शवत आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत