राहूरी फॅक्टरी येथील प्रांजलचा दिरासोबत विवाह.... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील प्रांजलचा दिरासोबत विवाह....

  राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव)  पतीच्या निधनानंतर सात महिन्याच्या बाळासह पोरकी झालेल्या व राहूरी फॅक्टरी येथे माहेर असलेल्या विधवा प्रांजली...

 राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव)

 पतीच्या निधनानंतर सात महिन्याच्या बाळासह पोरकी झालेल्या व राहूरी फॅक्टरी येथे माहेर असलेल्या विधवा प्रांजली सोबत लहान दिराने पुढे येत भाऊबंद, गावकरी व समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासे ) येथे लग्नगाठ बांधली. 

 राहुरी फॅक्टरी येथील बाळासाहेब गव्हाणे यांची कन्या प्रांजली हिचा  विवाह नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील संजय मोटे यांचा अभियंता असलेला थोरला मुलगा महेश याच्याशी संपन्न झाला. सर्व काही सुखरूप सुरू असताना  महेश याचे अपघाती निधन झाले. त्यामुळे प्रांजली सात महिन्यांच्या बाळासह पोरकी झाली.प्रांजलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे (राहुरी फॅक्टरी) निःशब्द झाले होते. आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते. सासरे संजय मोटे यांनीच यातून मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्रबरोबर करावा असता प्रस्ताव ठेवला. प्रांजली आणि महेंद्र यांचे मत घेतलं आणि ते राजी झाल्यानंतर हा विवाह संपन्न झाला

विधवा सुनेच्या आयुष्यात दाटलेल्या अंधाराला पुनर्विवाहाच्या निमित्ताने सास-यांनी प्रकाशाची वाट निर्माण करून दिली. सर्वसाधारपणे जे लोक किंवा कुटुंब रूढी-परंपरेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतात त्यांच्या नावाने नाकं मुरडली जातात. परंतु या दीर-भावजयीच्या लग्नगाठीचे समाजाने मोठ्या दिलाने स्वागत केलं. या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांच्या कामाला लोकांनी दाद दिली.

‘ मोठ्या भावाला यापेक्षा मोठी श्रद्धांजली असुच शकत नाही, असा प्रस्ताव माझ्याकडे मांडण्यात आला. माझ कुटुंबच माझ स्वप्नं असल्याने मी पणा बाजूला ठेवून विवाहास तयार झालो ‘, असे मत वर महेंद्र संजय मोटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले तर ‘ माझ्या लहान मुलाचा व विधवा सुनेचा ठरलेला विवाह मोजक्या लोकांत लपूनछपून एखाद्या मंदिरात केला असता. मात्र, मी समाजापुढे प्रेरणा ठरावी म्हणून मोठ्या थाटात हा विवाह केला आहे. यातून एकाने जरी आदर्श घेतला तरी हे कार्य सफल झाल्याचं समाधान होईल’ , असे वडील संजय मोटे यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत