सहमती एक्सप्रेसने पोलीस परेड ग्राउंड करिता प्रयत्न करावे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सहमती एक्सप्रेसने पोलीस परेड ग्राउंड करिता प्रयत्न करावे

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात पोलीस परेड ग्राउंड करिता आरक्षण जाहीर झाले असून नगरपालिकेच्या निष्क्रिय पणामुळे सदर प्रकरण उच्च न्यायालयात ग...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरात पोलीस परेड ग्राउंड करिता आरक्षण जाहीर झाले असून नगरपालिकेच्या निष्क्रिय पणामुळे सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून सध्या सुरू झालेल्या सहमती एक्सप्रेसने पोलीस परेड ग्राउंड करिता प्रयत्न करावे असे आवाहन, लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मागील काही वर्षांपूर्वी कोपरगाव तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले होते. सदर क्रीडा संकुल कोपरगाव तालुक्याचे माजीमंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी पळवले असा आरोप होत होता. कोपरगाव नगरपालिका हद्दीत जागेचा अभाव म्हणा की प्रत्यक्ष क्रीडा संकुल पळविण्याची भूमिका म्हणा पण त्या काळात तालुका क्रीडा संकुल उभे राहिले मात्र विधान सभा निवडणुकी पूर्वी तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न चांगलाच गाजला.  त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी सदर क्रीडा संकुलास भेट देऊन  "गायब झालेल्या तालुका क्रीडा संकुलाचा शोध लागला" असे  वक्तव्य केले.

कोपरगाव शहरात आता पोलीस परेड ग्राउंड करिता शासनाने आरक्षण जाहीर केले मात्र सदर जागा ताब्यात घेणेकामी कोपरगाव नगर पालिकेने हालचाली करणे आवश्यक होते मात्र त्या जागेची शासकीय रक्कम वेळेवर भरली नाही म्हणून मूळ मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून कोपरगाव  नगरपालिका व पदाधिकारी यांचा वेळकाढू पणा संशयास्पद असून यात नक्कीच काहीतरी मोठा कट शिजत असल्या शिवाय व अर्थ पूर्ण तडजोडी शिवाय हा वेळकाढू पणा सुरू असल्याचे शक्य नाही.

मात्र सद्या नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष आणि विद्यमान आमदार यांनी शहर व तालुक्याच्या विकासासाठी सहमती एक्सप्रेस सुरू केली आहे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील ज्या प्रमाणे कोपरगाव शहराच्या विकासासाठी  घोडदौड करून आपला वारु जोरदार पणे हाकत आहे .त्यात त्यांनी आपल्या विकास कामात या पोलीस परेड ग्राउंड करीता ही प्रयत्न करावेत अन्यथा मागील क्रीडा संकुल जसे कोपरगाव शहरातून पळवले असले तरी ते किमान उभे तरी राहिले.मात्र पोलीस परेड ग्राउंड च्या जागेकरिता हालचाली सुरू न केल्यास ते भविष्यात होणार देखील नाही मात्र यात नागरिकांचे नुकसान झाले तरी किमान कोणाला तरी मोठा लाभ होईल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत