देवळाली प्रवरा (वेबटीम) देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदाची दिपावली पाडवा या मुहुर्तावर माजी आ. चंद्रशेखर पा.कदम यांनी निव...
देवळाली प्रवरा (वेबटीम)
देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदाची दिपावली पाडवा या मुहुर्तावर माजी आ. चंद्रशेखर पा.कदम यांनी निवड केली. शुभ दिवशी निवड करुन चेअरमन पदी निवड करण्यात आलेल्या सोपानराव शेटे यांच्या नावास नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह पाच संचालक यांनी विरोध केला होता . या पाच हि संचालकांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. देवळाली प्रवरा सोसायटीत सत्यजित कदम यांच्या कडे ९ संचालक तर माजी आ. चंद्रशेखर कदम यांच्या कडे २ संचालक राहिले आहे.वडीलाने केलेल्या चेअरमनला मुलाचा विरोध होता. सोसायटीच्या राजकारणामागे देवळाली प्रवरा नगर पालिकेचे राजकारण छुपले असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.नगरसेविका उर्मिला शेटे यांना उपनगराध्यक्ष करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
देवळाली प्रवरा सोसायटीची सत्ता माजी आ.चंद्रशेखर पा.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. संस्थेच्या निवडणूकीत सभासदांनी एकहाती सत्ता माजी.आ. कदम यांच्या ताब्यात दिली संचालक मंडळातुन प्रत्येक वर्षी एका संचालकास चेअरमन होण्याची संधी देण्याचे ठरले होते. पहिल्यावर्षी सोपानराव शेटे यांना चेअरमनपदाची संधी देण्यात आली होती. दुसऱ्यावर्षी शहाजी कदम तर तिसऱ्यावर्षी सोपानराव भांड चौथ्यावर्षी दिलीपराव मुसमाडे पाचव्यावर्षी पुन्हा सोपानराव शेटे यांना संधी देण्यात आल्याने काही संचालकांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या जवळ नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष कदम यांच्या गटातील संचालकांना राजेंद्र ढुस यांना चेअरमनपदाची संधी मिळावी अशी अशा होती. परंतू माजी आ.कदम यांनी राजेंद्र ढुस यांना डावलून सोपानराव शेटे यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली.त्यामुळे नगराध्यक्ष कदम यांच्यासह सुरवातीला पाच संचालकांनी परखड नाराजी व्यक्त केली होती. पाच हि संचालक यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. आज मितीला नगराध्यक्ष कदम यांच्या बाजुने ९ संचालक उभे राहिले तर माजी आ. कदम यांच्या बाजुने अवघे दोन संचालक राहिले आहेत.त्यामध्ये सोपानराव शेटे, सोपानराव भांड यांचा समावेश आहे.
सोपानराव शेट यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या राजकारणात गरमागरम वातावरण आहे. चेअरमन निवडीनंतर नगराध्यक्ष कदम यांच्यासह पाच संचालकांनी आक्रमक पविञा घेतला.सोपानराव शेटे यांची निवड रद्द करा किंवा शेटे यांनी स्वतःहुन राजीनामा द्यावा असेहि नगराध्यक्ष कदम सह पाच संचालकांनी मागणी केली होती. त्यास प्रसिसाद मिळून शनिवारी सकाळी सोपानराव शेटे यांनी राजीनामा दिला. दरम्यान नगराध्यक्ष कदम आक्रमक पविञ्यात असतानाच अचानक आजारी पडल्याने सोसायटी राजकारणावर पडदा पडला आहे. परंतू ते उपचारा नंतर पुन्हा सक्रीय झाल्या नंतर पुन्हा सोसायटीचे राजकारण तापण्यास सुरवात झाली.शनिवारी सकाळी सोपानराव शेटे यांनी राजीनामा दिल्याने राजेंद्र ढुस यांना चेअरमन पदासाठी मार्ग मोकळा झाला आहे.अखेर सोसायटी राजकारणात नगराध्यक्ष कदम विजयी ठरले तर माजी आ. कदम यांना पराजयास सामोरे जावे लागले .
नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी उर्मिला शेटे यांच्या मार्गातील अडथळा दुर ? शेटेंना उपनगराध्यक्षपदी संधी देणार का?
सोसायटीच्या राजकारणामागे नगर पालिकेचे राजकारण छुपले असल्याची चर्चा सुरु असताना नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उर्मिला शेटे यांना संधी देण्यासाठी देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमनपद शेटे यांच्याकडे नको आहे अशी चर्चा समोर आली आहे.सोसायटी चेअरमन सोपानराव शेटे यांचे पद काढुन घेवून त्याजागी राजेंद्र ढुस यांना संधी मिळावी यासाठी नगरपालिकेतील काहि नगरसेवेक पुढाकार घेतला. झाले हि तसेच सोपानराव शेटे यांनी राजीनामा दिला.ढुस यांची चेअरमनपदी वर्णी लागणार सोसायटीच्या राजकारणात नंतर नगर पालिकेचे उपनगराध्यक्षपद उर्मिला शेटे यांना देण्यात येईल अशी हि चर्चा नगरसेवक व संचालक मंडळात चालू होती. नगराध्यक्ष कदम उपनगराध्यक्षपदी उर्मिला शेटे यांना संधी देणार की यापुर्वी राजकारणात जसे घडले तसेच यावेळी होणार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत