कोपरगाव नगराध्यक्षांच्या कार्य तत्परतेला सलाम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव नगराध्यक्षांच्या कार्य तत्परतेला सलाम

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर नगराध्यक्ष यांनी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे काम ...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर नगराध्यक्ष यांनी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे काम दिड वर्षांपासून उदघाटन करून देखील अद्याप पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे नगराध्यक्ष साहेबांच्या कार्य तत्परतेला सलाम करावा तेवढा कमीच आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  व्यक्त केले आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की ,गेल्या अकरा- बारा वर्षांपासून कोपरगाव शहर व तालुक्यातील अण्णा भाऊ प्रेमी  नागरिक व समाज बांधव कोपरगाव शहरात जगतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी करत होते. मात्र या ना त्या कारणाने सदर काम अडचणीत सापडत गेले माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुरेखा ताई राक्षे,ऐश्वर्याताई सातभाई यांनी आपल्या कार्यकाळात प्रयत्न केले .सुरेखा ताई राक्षे यांनी त्यांचे कार्यकाळात  पूर्णाकृती पुतळा तयार करून घेतला व सर्व परवानग्या मिळविण्या साठी पाठपुरावा केला मात्र त्यात अनेक अडचणी असल्याने दुर्दैवाने ते काम होऊ शकले नाही.

गेल्या साडे चार वर्षांपूर्वी  लोकप्रिय व लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आल्या नंतर समाज बांधवांनी त्यांच्या कडे पूर्णाकृती पुतळा लवकर बसवावा अशी मागणी केली त्यावेळी त्यांनी एक वर्षाच्या आता पूर्णाकृती पुतळा शहरात दिमाखात बसवू असे आश्वासन दिले मात्र एक वर्षात काहीच हालचाल झाली नाही म्हणून लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने त्यांच्या आश्वासनाचा त्यांच्याच हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.

त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम करून समाज बांधवांची कमिटी स्थापन केली मात्र दोन वर्षांच्या कालावधीत ना कमिटीची बैठक झाली ना कोणाला विश्वासात घेतले .मात्र नगराध्यक्ष साहेबांना दिड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत  आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने त्यांनी आचार संहितेपुर्वी त्यांच्या कार्य तत्परतेने घाईत उदघाटन करून घेतले मात्र आचार संहितेत पुन्हा काम बंद पडले विधान सभेची निवडणूक होऊन दीड वर्ष झाले मात्र साधारण शंभर ते दोनशे चौरस फूट असलेले काम अद्याप पूर्ण होत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल .

मात्र त्यानंतर शहरातील सार्वजनिक वाचनालय, नगरपालिका इमारत, बस स्थानक आदी मोठमोठया वास्तू चे बांधकाम पूर्ण झाले अनेक विकास कामाच्या निविदा निघाल्या उदघाटने झाली,कामे सुरू झाली मात्र या कार्य तत्परतेत अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे काम नेमके कोणत्या कारणाने आडले ते मात्र अध्याप समजले नाही मात्र एव्हडे असले तरी त्यांच्या कार्य तत्परतेला सलाम करावे तेव्हडे थोडेच आहे असे या पत्रकात म्हटले असून या पत्रकावर माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के, किरण अढांगळे, सुजल चंदनशिव,दत्तू खैरनार, प्रवीण शेलार किरण सोळशे, गोपीनाथ ताते, राजू रोकडे आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत