कोपरगाव प्रतिनिधी कोपरगांव तालुक्यात ग्रामिण भागात बीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव तालुक्यात ग्रामिण भागात बीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून सदर कंपनीमार्फत ग्रामिण भागात मिटर रिडींग घेण्याचे काम सुरु आहे असे असतांना दिलीप चकोर यांनी कामावरुन तिन कामगारांना शिवीगाळ करुन काढून टाकले त्यामुळे ते कामगार यांनी सर्व प्रकार मनसे शहराध्यक्ष सतिषआण्णा काकडे यांना सांगितला.
यावेळी कामगारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दिलीप चकोर यांच्या चाणक्य मल्टीस्टेट कंपनी बाबत व दिलीप चकोर यांच्या कंत्राटाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. याचा राग मनात धरुन दिलीप चकोर व त्यांचे मित्र दिलीप अभंग संगमनेर यांनी सतिष आण्णा काकडे यांना फोनवरून तुम्हिी दिलीप चकोर यांना माहितीचा अधिकार का मागितला व अरेरावीच्या भाषेत बोलून शिवीगाळ करुन तू जर दिलीप चकोरला त्रास दिला तर तुझा बेत पाहातो तुझा गेमच लावतो अशा भाषेत त्याने सतिष आण्णा काकडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यामुळे सतिष आण्णा काकडे यांनी दिलीप चकोर व दिपक अभंग यांच्या विरोधात कोपरगांव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अजुनही त्यांना अटक झालेली नसून त्यांना लवकरात लवकर अटक करावीअन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा ईशारा पत्रकान्वये दिला आहे.
या पत्रकावर शहराध्यक्ष सतिश काकडे,उपशराध्यक्ष अनिल गाडे, उपशहराध्यक्ष
विजय सुपेकर, उपतालुकाअध्यक्ष रघुनाथ मोहिते,बापू काकडे,आनंद परदेशी,संजय जाधव,बंटी सपकाळ,जावेदभाई शेख, सचिन खैरे,नवनाथ मोहिते आधी मनसे पदाधिकाऱ्याचा सह्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत