देवळाली प्रवरा(वेबटीम) आपल्या शेतात ऊस तोडणी करणारा ऊसतोडमजूर जेव्हा ग्रामपंचातीत बिनविरोध निवडून आल्याचे समजताच राहूरी तालुक्यातील देवळा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
आपल्या शेतात ऊस तोडणी करणारा ऊसतोडमजूर जेव्हा ग्रामपंचातीत बिनविरोध निवडून आल्याचे समजताच राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी विश्वास पाटील यांनी मोठ्या आनंदाने त्या ऊस तोडणी कामगाराच्या शिरपेचात फेटा बांधून सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
देवळाली प्रवरा येथील ऊस उत्पादक शेतकरी तथा समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील हे आपल्या शेतात ऊस पीक घेतात दरवर्षी ऊसतोडणीसाठी नांदगाव तालुक्यातील रणखेडा येथील राजू बाबू हिलम हा ऊसतोडणीसाठी येत असत. गेल्या २० वर्षांपासून तो विश्वास पाटील यांच्या शेतातील ऊस तोडणी करतो.
ग्रामपंचायत निवडणूकित राजू हिलम याने आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूकिसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतू त्याच्या विरोधात कुणाचाही अर्ज न आल्याने साहजिकच बिनविरोध निवडून आला. शेतात ऊसतोडणी करून आपला प्रपंच चालविणारा राजू हिलम ग्रामपंचायत सदस्य बनल्याने देवळाली प्रवरा येथील शेतकरी विश्वास पाटील यांनी मोठ्या मनाने राजू हिलम याचा आपल्या शेतात सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत