कोपरगाव बस आगारच्यावतीने सुरक्षितता मोहीम सुरु - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव बस आगारच्यावतीने सुरक्षितता मोहीम सुरु

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगा व येथील बस आगारात   १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवण्यात येणार असून त्याचे उदघाटन ग्रा...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव येथील बस आगारात   १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवण्यात येणार असून त्याचे उदघाटन ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

 या प्रसंगी बोलताना श्री जाधव म्हणाले, अपघात व सुरक्षितता यावर उपाय योजनांची कोणती आवश्यकता आहे. याबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात राज्यातील ३१ आगारातील विभाग नियंत्रकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी लेखी पत्र व आदेश केले आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील तारकपूर ,श्रीरामपुर, संगमनेर, कोपरगाव ,जामखेड ,शेवगाव ,पारनेर पाथर्डी ,श्रीगोंदा, नेवासा ,अकोले या आगारात सुरक्षितता मोहीम पाळण्यात येणार आहे .

या अभियानाचे 'सडक सुरक्षा जीवन रक्षा'असे घोषवाक्य महामंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व विभागीय अधिकारी आगारप्रमुख पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांनी अपघात आकडे कल असलेल्या चालकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे वेगमर्यादा न पाळल्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे योग्य पद्धतीने वाहन चालवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी सूचना करून अतिवेगाने वाहन चालवू नये वाहकाच्या मदतीशिवाय गाडीमागे घेऊ नये चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनाला ओलांडू नये वाहनाचा वेग आवश्यक तेथे कमी करावा योग्य ती सावधगिरी न घेता वाहन एकाएकी थांबू नये अशा विविध मोलाच्या सूचना करून वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळावा गाणे ऐकू नये वळणावर गाडी व्यवस्थित वळवावी, दारु अमली पदार्थ सेवन करून बस गाडी चालू नये असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख अभिजित चौधरी होते. याप्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अमोल बनकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक उज्वला कुटे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र खंडीझोड, सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण बिडवे, विजय साळुंखे ,प्रभाकर सोनाली संगम, कर वाहतूक निरीक्षक संजीव गाडे यांच्यासह यांत्रिक कर्मचारी चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. एस .जाधव यांनी केले. स्वागत मिलिंद कोपरे यांनी तर आभार चालक शरद शिंगाडे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत